शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
4
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
5
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
6
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
7
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
8
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
9
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
10
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
11
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
12
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
13
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
14
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
15
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
16
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
17
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
18
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
19
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
20
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले

स्मिता आणि पूर्वा शहाणे जोडी ठरली नं. १

By admin | Updated: December 22, 2015 23:54 IST

औरंगाबाद : लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सासू-सुनांचे नाते दर्शविणाऱ्या एका कौटुंबिक कार्यक्रमाचे म्हणजेच ‘जोडी नं. १ सासू-सून’चे आयोजन करण्यात आले होते

औरंगाबाद : जीवनाचे अनेक रंग दाखविणारे कौटुंबिक चॅनल कलर्स व स्त्रियांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ देणारे लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सासू-सुनांचे नाते दर्शविणाऱ्या एका कौटुंबिक कार्यक्रमाचे म्हणजेच ‘जोडी नं. १ सासू-सून’चे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १२ सासू- सुनांच्या जोड्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला आणि कार्यक्रमाला रंगतदार बनविले. ‘जोडी नं. १ सासू-सून’ होण्यासाठी चार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी पहिली फेरी होती परिचय फेरी म्हणजेच बिनधास्त बोल फे री. या फे रीत सासू-सुनांना एका मिनिटात एकमेकींचा परिचय करून द्यायचा होता. अनेक जोड्यांची या फेरीमध्येच धांदल उडाली.काहींनी एकमेकींवर कविता सादर करून कवितेद्वारे एकमेकींची ओळख करून दिली. विशेष म्हणजे सविता शिंदे ही नऊ महिन्यांची गर्भवतीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाली होती. दुसरी फेरी होती सादरीकरण फेरी. सासू-सून जोडीची एकत्रितपणे एखादी गोष्ट करण्याची हातोटी तपासणे, तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे हा या फेरीमागचा उद्देश होता. अनेक जोड्या या फेरीत प्रभावी ठरल्या. सासू-सून जोड्यांनी नाटक, भजन, गीते आणि एकत्रितपणे नृत्यसुद्धा सादर केले.काही जोड्यांमध्ये तर आजवर कधीही व्यासपीठावर न येणाऱ्या सासूबार्इंचा उत्साह सूनबार्इंना लाजविणारा होता. सासू-सुनांमध्ये असणारा सुसंवाद या निमित्ताने दिसून आला.यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर फेरीमध्ये परीक्षकांनी या जोड्यांना प्रत्येकी एक-एक प्रश्न विचारला. स्पर्धकांचा हजरजबाबीपणा तपासणे, तसेच न बिचकता चटकन उत्तर देणे अपेक्षित होते. यात पौराणिक प्रश्नांपासून ते थेट आताच्या निर्भया प्रकरणापर्यंतचे अनेक प्रश्न विचारण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिके- रत्ना आणि कीर्ती बाविस्कर, लताबाई आणि सविता शिंदे, मीना आणि अश्विनी दहीहंडे आदी सासू-सून जोड्यांनी मिळविली. विजेत्यांना लोकमतचे संपादक चक्रधर दळवी, विनोदवीर प्रकाश भागवत तसेच स्नेहा कदम, परीक्षक संगीता दीक्षित, शोभा दांडगे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. नीता पानसरे यांनी संचालन केले.‘जोडी नं. १ सासू-सून’ या कार्यक्रमाची तयारी करीत असताना स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या घरी कसे वातावरण असेल, यावर सादर केलेला एक विनोदी कार्यक्रम सखींना विशेष आवडून गेला.या संपूर्ण कार्यक्रमाचे परीक्षण गायिका आणि वकील असणाऱ्या संगीता महामुनी- दीक्षित यांनी आणि अभिनेत्री- निवेदिका शोभा दांडगे यांनी केले. या सगळ्या फेऱ्यांमध्ये चांगले सादरीकरण करून आणि परीक्षकांच्या कसोटीला खरे उतरून सासू स्मिता, तर सून पूर्वा शहाणे या जोडीने विजय मिळवीत ‘जोडी नं. १ सासू-सून’ हा किताब पटकाविला. द्वितीय क्रमांक सुनीता-कीर्ती देशपांडे यांना मिळाला, तर परफेक्ट मॅचिंग करून आलेल्या मंजूषा आणि निशिगंधा काळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. यानंतर कलर्स फेरी घेण्यात आली. या फेरीत कलर्स चॅनलवरील ‘ससुराल सिमरन का’, ‘मेरी आशिकी तुमसे है’, ‘थपकी’, ‘नागिन’ या लोकप्रिय मालिकांमधील सासू-सुनांचे काही प्रसंग स्पर्धकांना दाखविण्यात आले. नंतर आवाज बंद करून स्पर्धकांना दाखविण्यात आलेले मालिकेतील प्रसंग जसेच्या तसे अभिनय करून सादर करायचे होते. परफेक्ट मॅचिंग फेरीत सासू-सुनांचा पेहराव एकमेकींशी किती मिळताजुळता आहे, ते तपासले गेले. अनेक जोड्यांनी या कार्यक्रमासाठी खास खरेदी केली होती. टिकल्यांपासून ते चपलांपर्यंत तंतोतंत सारखे घालून आलेल्या जोड्यांना गुण देताना परीक्षकांची धांदल उडाली. ‘फू बाई फू ’ फेम प्रकाश भागवत आणि स्नेहल कदम यांनी प्रत्येक फेरीनंतर विनोदी चुटकुले सादर करून सर्व सखींना हसते ठेवले.