शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लहान आगीमुळे मोठी दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:35 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहाला वीजपुरवठा करणा-या जंक्शन बॉक्समध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुपारी १ वाजेदरम्यान लागलेल्या आगीने जिल्हा प्रशासनाची धांदल उडविली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहाला वीजपुरवठा करणा-या जंक्शन बॉक्समध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुपारी १ वाजेदरम्यान लागलेल्या आगीने जिल्हा प्रशासनाची धांदल उडविली. लोकशाही दिनाच्या तक्रारींवर जिल्हाधिकारी दालनालगतच्या छोट्या सभागृहात सुनावणी सुरू होती, त्याऐवजी डीपीसी सभागृहात जर सुनावणी सुरू असती तर मोठा गदारोळ होऊन दुर्घटना घडली असती. आगीमुळे जीवित आणि वित्तहानी झाली नाही.त्या सभागृहाची ये-जा करणारे दरवाजे लहान आहेत. शिवाय आपत्कालीन दरवाजालगत असलेला जिना रद्दीने आणि निकामी साहित्यामुळे बंद पडल्यासारखाच आहे. सोमवार आणि कामकाजाचा पहिलाच दिवस असल्यामुळे कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्यापूर्वी झालेल्या आवाजामुळे सुनावणी हॉलमध्ये असलेले उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, क्लार्क मीर जाफर अली यांनी डीपीसी सभागृहाकडे धाव घेतली. तेथील फायर इश्टिंगशर उघडून सीओटूची फवारणी केली. त्यामुळे आग तातडीने आटोक्यात आली; परंतु जिल्हाधिका-यांच्या दालनाकडे आणि सभागृहाकडे जाणाºया मार्गावर धुराचे साम्राज्य निर्माण झाले. फायर इश्टिंगशरमधील सीओटूच्या फवारणीनंतर धुळीकणांमुळे अनेकांच्या घशाला त्रास झाला. डीपीसी सभागृहात तब्बल तीन तासांपर्यंत घुसमट करणारे वातावरण होते.