शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी होणार कौशल्य विकास केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 20:03 IST

पाच टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील हडस पिंपळगाव, घायगाव, बाबतारा येथे ही केंद्रे प्रस्तावित आहेत.

ठळक मुद्देतीन वर्षांत ५० कोटींची उलाढाल असलेल्या संस्थांना या निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार

औरंगाबाद : जिल्ह्यात समृद्धी महामार्गाअंतर्गत तीन ठिकाणी कौशल्य विकास, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा मागविल्या आहेत. ३० वर्षांच्या करारांतर्गत हे केंद्र विकसित करण्यात येणार असून, महामार्गालगतच्या ग्रामीण भागात कुशल मनुष्यबळनिर्मितीसाठी या केंद्राचा उपयोग होईल, असा दावा करण्यात येत आहे.

पाच टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील हडस पिंपळगाव, घायगाव, बाबतारा येथे ही केंद्रे प्रस्तावित आहेत. एमएसआरडीसी खाजगी संस्थांसोबत भागीदारीतून सदरील केंद्र विकसित करणार आहे. औरंगाबादसह वर्धा, बुलडाणा, ठाणे याठिकाणी सदरील केंद्रे प्रस्तावित आहेत.मागील तीन वर्षांत ५० कोटींची उलाढाल असलेल्या संस्थांना या निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार आहे.  

या क्षेत्राशी निगडित मिळेल प्रशिक्षणकृषिसेवा, आॅटोमोबाईल्स टूल्स, बीएफएसआय, बिल्डिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन्स, केमिकल्स अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स, शिक्षण, अन्न व प्रक्रिया, जर्म्स अ‍ॅण्ड ज्वेलरी, ट्रामा सेवा, आयटी क्षेत्र, वायरलेस सिस्टम, पर्यटन व आदरातिथ्य मार्केटिंग, वाहतूक व दळणवळण, इलेक्ट्रिक, कारपेंटरी, सिव्हिल, वेल्डिंंग, प्लंबिंग आदी विषयांसाठी या केंद्रांतून प्रशिक्षण मिळणार आहे. सध्या मिळणारे शिक्षण अपग्रेड करून रोजगारनिर्मितीसाठी ही केंद्रे निर्माण करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. ..........

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गEducation Sectorशिक्षण क्षेत्र