शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्टील बॉडीची ‘एसटी’ घेतेय आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:18 IST

एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत स्टील बॉडी (माइल्ड स्टील) परिवर्तन बसगाड्यांच्या बांधणीला सुरुवात झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत स्टील बॉडी (माइल्ड स्टील) परिवर्तन बसगाड्यांच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने अ‍ॅल्युमिनियमऐवजी स्टील बॉडीमध्ये बांधण्यात येणारी ही एसटी हळूहळू आकार घेत आहे.एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत गेल्या अनेक वर्षांपासून अ‍ॅल्युमिनियम बांधणीतील बसची निर्मिती करण्यात येते. या बसगाड्यांनी ‘एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास’ ही ओळख निर्माण केली. आता महामंडळ त्यापुढे पाऊल टाकत स्टील बॉडीच्या बसची निर्मिती करीत आहे.रस्त्यावरील प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी स्टील बॉडीच्या परिवर्तन बस (लाल बस) बांधणीचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यानुसार चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत प्रायोगिक तत्त्वावर अशा पाच बस बांधण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या बस बांधणीला सुरुवात झाली आहे.चेसिसवर बसचा लोखंडी सांगाडा तयार झाला आहे. अ‍ॅल्युमिनियमच्या बसमध्ये हा सांगाडा तयार करण्यासाठी अ‍ॅल्युमिनियमच्या पाइपबरोबर नट-बोल्टचा वापर केला जातो; परंतु स्टील बॉडीमध्ये नट-बोल्टांची जागा वेल्डिंगने घेतली आहे. सध्याच्या अ‍ॅल्युमिनियम बसपेक्षा स्टील बॉडी बस अधिक मजबूत राहणार आहे.वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे या बसची उंचीही अधिक राहणार आहे. त्यामध्ये प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा राहणार आहेत.या बस बांधणीचे काही कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियमित कामकाज सांभाळून या बसची बांधणी केली जात आहे. या बसमध्ये चालकाजवळ माइक व स्पीकर, डिजिटल मार्ग फलक, आपत्कालीन अलार्म, मोठ्या आकाराच्या खिडक्या यासह विविध सुविधा राहणार आहेत. बसची बांधणी सुरू असून आवश्यक असलेले साहित्य दिल्ली, कोलकाता अशा विविध ठिकाणांहून आणले जात आहे, अशी माहिती कार्यशाळा व्यवस्थापक यू. ए. काटे यांनी दिली.