शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

सहा अधिकाऱ्यांची होणार चौकशी

By admin | Updated: November 6, 2016 00:56 IST

औरंगाबाद : फाजलपुरा येथील टीडीआर घोटाळा प्रकरणात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सहायक संचालक नगररचना अधिकारी डी. पी. कुलकर्णी यांच्यासह चार

औरंगाबाद : फाजलपुरा येथील टीडीआर घोटाळा प्रकरणात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सहायक संचालक नगररचना अधिकारी डी. पी. कुलकर्णी यांच्यासह चार अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांचीही विभागीय चौकशी करण्यासाठी सर्वसाधारण सभेने मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. १९ नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेत या विषयांवर चर्चा होणार आहे.फाजलपुरा आणि आलमगीर कॉलनी येथे टीडीआर देताना मनपा अधिकाऱ्यांनी कायदे, नियम, अटी, शर्र्तींचे उल्लंघन केले होते. या प्रकरणात सहायक संचालक नगररचना डी. पी. कुलकर्णी यांच्यासह उपअभियंता शिरीष रामटेके, शाखा अभियंता राजेंद्र वाघमारे यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणात सहभाग असलेले निवृत्त उपअभियंता सय्यद फहिमोद्दीन, शाखा अभियंता मोहंमद वसील यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.फटाक्यांच्या १४० दुकानांना आग लागल्याप्रकरणी मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांना २९ आॅक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले. त्यांचीही विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी दोषारोपपत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. हर्सूल तलावातील गाळ काढण्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याने शहर अभियंता एस. डी. पानझडे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांचेही दोषारोपपत्र तयार करण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांचीही विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तीन बिबटे डॉ. नाईकवाडे यांच्या हलगर्जीपणामुळे मरण पावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.