लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ मे रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. निलंगा तालुक्यातील विविध कामांना ते भेटी देऊन पाहणी करणार आहेत. शिवाय त्यांचा २४ मे रोजी निलंगा येथे मुक्काम राहणार आहे. त्यानिमित्त पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी खरोसा लेणी, औराद शहाजानी, हलगरा, हंगरगा आदी गावांतील विकास कामांची स्थळ पाहणी केली. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री भेट देणार आहेत, त्या सर्व ठिकाणांची स्थळ पाहणी पालकमंत्र्यांनी मंगळवारी केली. औसा तालुक्यातील खरोसा लेणी, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, हलगरा येथील श्रमदान ठिकाण, जलयुक्त कामे, अनसरवाडा येथील शेततळ्याच्या काामावर भेट देऊन पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम, कार्यकारी अभियंता चिश्ती, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे-पाटील, रामेश्वर रोडगे, तहसीलदार विकास देशमुख आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त पालकमंत्र्यांकडून स्थळ पाहणी
By admin | Updated: May 24, 2017 00:32 IST