शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सर्जा-राजा मला माफ कर, पोळ्याच्या आधी बैलजोडी विकण्याची नामुश्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 6:53 PM

डोक्यावर दुष्काळाचे सावट व भविष्यातील गरजा भागविण्यासाठी शेतक-यांच्या सर्वात प्रिय पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर  बैल जोड़ी विकण्याची नामुश्की काही शेतकऱ्यांवर येवून ठेपली आहे.

ठळक मुद्दे डोक्यावर दुष्काळाचे सावट व भविष्यातील गरजा भागविण्यासाठी घेतला निर्णय पोळ्या साठीच्या खरेदीसाठी दुकानांकडे फिरवली पाठ 

ऑनलाईन लोकमत / श्यामकुमार पूरे

सिल्लोड ( जि. औरंगाबाद ), दि. २० : सिल्लोड तालुक्यात काही भाग वगळता दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. खरिपाचे पीक वाया गेल्याने हातचा पैसा निघुन गेला आहे. डोक्यावर दुष्काळाचे सावट व भविष्यातील गरजा भागविण्यासाठी शेतक-यांच्या सर्वात प्रिय पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर  बैल जोड़ी विकण्याची नामुश्की काही शेतकऱ्यांवर येवून ठेपली आहे. भराडी येथे  शनिवारी भरलेल्या बाजारात सर्जा- राजा मला माफ कर, असे म्हणून कवडिमोल भावात काही शेतक-यांनी जनावरे विकली.निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र सिल्लोड तालुक्यात दिसत आहे.

तालुक्यातील भराड़ी येथे शनिवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात लहान मोठी जनावरे मिळून जवळपास 140 जनावरे विक्री साठी आली होती. 50 ते 60 हजारात विक्री होणारी मोठी बैल जोड़ी केवळ 30 ते 35 हजारात तर 30 ते 35 हजारात विकली जाणारी लहान जोड़ी केवळ 15 ते 20 हजारात विक्री झाली. बाजारात ही जनावराना योग्य किंमत मिळाली नाही. यामुळे शेतकरी हताश झाले. 

सिल्लोड तालुक्यात गेल्या 4-5 वर्षापासून सतत दुष्काळ सदृश्य स्थिती कायम आहे. पीक लागवडी वर खर्च होतो पण दरवर्षी हा खर्च भरून येईल इतके उत्पन्न होत  नसल्याने शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी पणात वाढ होत आहे. शेतकऱ्यांना जनावरे संभाळने कठिन झाले आहे.परिणामी शेतकऱ्याकडे जनावरे कमी होत चालली आहे. आपल्या गरजा भागवुन लोकांचे कर्ज फेडणे हे शेतकऱ्यांपुढील आव्हान आहे.

दुकानांकडे फिरवली पाठ आजचा बाजार सर्जा-राजासाठीच्या खास सजावट वस्तुने  भरलेला होता. यामध्ये कासरे, गोंडी, नाथा, केसरी, रंगाचे डबे, घागर माळा, झूले, पैंजण, छबी, गेटी, कवड़याच्या माळा, बाशिंगे, गळ्यातील गोप व घागर माळा आदी वस्तूंनी नटलेला होता. परंतु, हाताची पिके गेल्याने दुष्काळी परीस्थित लक्ष्यात घेता शेतकरी हातच राखून या दुकानांकडे फिरकलेच नाही. 

जीएसटी लागू झाल्याने भावातही वाढ आहे. कोणतेही सजावटीचे सामान हे मागील वर्षापेक्षा जास्त किंमतीचे आहे. यामुळे यावर्षी बैलाच्या सजावटीसाठीचे हे समान घेण्यासाठी शेतकरी सरसावला नाही. उलट जूने साहित्यच वापरू असा विचार करून केवळ भावाची विचारपूस करत दुकानातून काढता पाय घेत आहे. आता शेवटच्या दिवशी मोठ्याप्रमाणात खरेदी-विक्री होईल या आशेवर व्यापारी आहेत. 

साहेब नाव छापु नकाजनावरांच्या चारा पाण्याची चिंता, डोक्यावर दुष्काळाचे सावट. यामुळे आता काही शेतकऱ्यानी त्यांच्या प्रिय सर्जा- राजाच्या जोडीला बाजाराची वाट दाखवली आहे. सण साजरा करण्या ऐवजी त्यांना बाजारात विकावे लागण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली आहे. सणाच्या आदल्या दिवशी जनावरे विकली अशी बदनामी होईल असे म्हणत बाजारात आलेली शेतकरी, 'आमचे नाव छापु नका...' अशी विनंती करत होते.

शेतक-यांचा अंत पाहू नये...शासनाने शेतकऱ्यांचे  सातबारे कोरे करावे. तात्काळ दुष्काळ जाहीर करून पंचनामे करावी व शेतकऱ्यांना मदत द्यावी. आता केवळ आश्वासन देवून शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये.- अब्दुल सत्तार, आमदार,  सिल्लोड -सोयगाव .