शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
3
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
4
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
5
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
6
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
7
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
8
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
9
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
10
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
11
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
12
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
13
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
14
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
15
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
16
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
17
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
18
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
19
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
20
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!

साहेब, आमदार रोडवर जायचे कसे? सातारावासीयांना पडला प्रश्न; वाहनधारकांचा जीव मुठीत

By साहेबराव हिवराळे | Published: February 29, 2024 7:06 PM

संग्रामनगर पुलावरून उतरल्यावर बायपासला जावे लागते ‘विरुद्ध दिशेला’

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासचा कायापालट करून नुकतेच तीन फ्लायओव्हर उभारण्यात आले. मात्र, या बायपासला सर्व्हिस रोडचे काम सुरू करून नागरिकांना पुन्हा वेठीस धरणे सुरू झाले आहे. पादचारी, वाहनधारक सर्वांनाच जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून जावे लागत आहे. सर्व्हिस रोडचे काम सुरू झाल्याने नाइलाजाने संग्रामनगर पुलावरून बायपासच्या खालून विरुद्ध दिशेने तर कायमच अपघातास आमंत्रण दिले जात आहे. इथे या रस्त्यावरील प्रवास नेमका जीवघेणा ठरत आहे.

नेमके काय होत आहे ?- सातारा आमदार रोडवरून घरी जाताना त्यांंना या रस्त्याचा अंदाजच येत नसल्याने या रस्त्यावरील प्रवास गुंतागुंतीचा ठरत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलिस, महानगरपालिका प्रशासनाने एकत्र लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.- पुलावरून येताना सातारा यू टर्न घेऊन जाणे सोपे; परंतु संग्रामनगरकडून दवाखान्यासमोरून चार रस्ते ओलांडून यू टर्न करून गाडी चालवणे धोक्याचे ठरते आहे. कारण इथे सिग्नल नाही. वाहतूक पोलिसही नसतो आणि असल्यास तो काहीही सांगत नाही. यामुळे वारंवार अपघात होत आहेत.

किती दिवस लागणार ?रस्त्याच्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम सुरू असून, एमआयटीकडून येणाऱ्या रस्त्यावर पुलाखालूनच जीव मुठीत धरून सातारा गावात प्रवास करावा लागणार का?- गणेश पवार (नागरिक)

महिला, मुलांसाठी अधिक धोकाशहरातून येणाऱ्या महिला व लहान मुलांंना ये-जा करावी लागते. विरुद्ध दिशेने वाहने पळविणे त्रासदायक ठरते आहे.- विजय कुडे (नागरिक)

अपघात नको म्हणून पूल...अपघाताच्या घटना टाळाव्यात म्हणून रस्ता मोठा झाला. पूल टाकला; परंतु रस्ता बनविताना सामान्य नागरिकांना का विचारात घेतले नाही. साताऱ्यात जावे कसे ?- प्रवीण पवार (नागरिक)

येथे अनेकदा भांडणे होतात...पुलावर जाणे तर दूरच राहिले. वाहतूक पोलिसांसमोरच सर्व वाहनधारक या गुंतागुतींच्या रस्त्यावरून आडवे जातात. गावात जाताना अडचणीला तोंड दिले जाते.- शैलेश सांगोळे (नागरिक)

सिग्नल हवेसिग्नल लावण्याची जबाबदारी कोणाची हे पाहायला हवे. वाहतुकीला नियम लावण्याचे काम पोलिसांचे तर सिग्नल लावण्याची जबाबदारी मनपाची असून त्याकडे लक्ष प्रशासनाने द्यावे, अन्यथा यू टर्न मार्ग पुलावरून घ्यावा.- सुनील कोळसे, शाखा अभियंता. 

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा