शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नांदेड विभागातील रेल्वेचे एकेरी मार्ग विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 11:53 IST

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

ठळक मुद्देनांदेड विभागात रेल्वेचे इंजिन नादुरुस्तीच्या घटनेनंतर रेल्वेची वाहतूक ठप्प होते.इंजिन दुरुस्त होणे अथवा दुसरे इंजिन येण्यात बराच वेळ जातो.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु अद्यापही विद्युतीकरणाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी २० डिसेंबर २०१७ रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनची पाहणी केली. यावेळी नांदेड विभागातील रेल्वेमार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम सुरू होणार असून, विद्युतीकरणाच्या कामाने इंजिन नादुरुस्तीच्या घटनांना कायमस्वरुपी आळा बसेल, असे ते म्हणाले. यानंतर विद्युतीकरणाच्या कामासाठी १२ जानेवारीपासून नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. यात रेल्वे पूल, लेव्हल क्रॉसिंग (भुयारी मार्ग), वळण, सिग्नल, पॉइंट अ‍ॅण्ड क्रॉसिंग आदींविषयी माहिती गोळा करण्यात आली. 

नांदेड विभागात रेल्वेचे इंजिन नादुरुस्तीच्या घटनेनंतर रेल्वेची वाहतूक ठप्प होते. इंजिन दुरुस्त होणे अथवा दुसरे इंजिन येण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे तासन्तास रेल्वे वाहतूक खोळंबते. शनिवारी याच अनुभवाला प्रवाशांना पुन्हा एकदा सामोरे जावे लागले. गेल्या अनेक वर्षांपासून दुहेरीकरणासह विद्युतीकरणाची मागणी आहे. एप्रिलपासून एके री मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू होईल, असे सांगण्यात आले. परंतु त्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. याविषयी ‘दमरे’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. 

नादुरुस्तीच्या घटनाएप्रिल ते सप्टेंबर २०१७ कालावधीत दक्षिण मध्य रेल्वेच्या संपूर्ण झोनमध्ये ६० डिझेल इंजिन नादुरुस्तीच्या घटना घडल्या. दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन २८ आॅक्टोबर २०१७ रोजी आसनगाव-आटगावदरम्यान नादुरुस्त झाले. तर नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेसचे इंजिन १४ एप्रिल रोजी बदनापूर-जालनादरम्यान नादुरुस्त झाले आणि रेल्वेची वाहतूक दोन तास ठप्प झाली.

पर्यटन सचिवांना सीएमआयएचे निवेदन चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए) या उद्योजकांच्या मराठवाड्यातील अ‍ॅपेक्स बॉडीने केंद्रीय पर्यटन सचिव रश्मी वर्मा यांना पर्यटनाच्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. आयकॉनिक पर्यटन स्थळे म्हणून ओळख असलेल्या अजिंठा, वेरूळ लेण्यांच्या विकासासाठी विशेष बैठकीचे आयोजन वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना हे निवेदन देण्यात आले, अशी माहिती सीएमआयएचे माजी अध्यक्ष आशिष गर्दे यांनी कळविली. 

यावेळी राज्य पर्यटन खात्याचे सचिव विजयकुमार गौतम, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांची उपस्थिती होती. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमाने जात नाहीत. दिल्ली-आग्रा-जयपूर-उदयपूर आणि इतर महत्त्वपूर्ण पर्यटन मंडळाशी औरंगाबादला जोडले जावे. अजिंठा, वेरूळ, देवगिरी किल्ला,बीबीका मकबरा येथे लाईट व म्युझिक शो सुरू करावा. अजिंठा लेणी परिसरात रोप-वे सुरू करावा. या इतर अनेक मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीGovernmentसरकारNandedनांदेडAurangabadऔरंगाबाद