शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

५० टक्क्यांनी वाढले रेशीमक्षेत्र

By admin | Updated: June 22, 2017 23:24 IST

हिंगोली : जिल्ह्यातील बरेच शेतकरी पारंपरिक पिकाला बगल देत रेशीम शेतीकडे वळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील बरेच शेतकरी पारंपरिक पिकाला बगल देत रेशीम शेतीकडे वळले आहेत. जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयाकडून ३०१ शेतकऱ्यांची निवड केली आहे. त्यापैकी २२४ शेतकऱ्यांच्या प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. यंदा रेशीम शेतीत ५० टक्क्याने वाढ झाली आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पारंपारीक पिकाचे नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. पाचही तालुक्यातील ३०१ शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी जिल्हा कार्यालयात नोंद केली आहे. यात औंढा, वसमत तालुक्यातील जांब येथे २५, शिंदगी ३०, पांगरा शिंदे ३८, गुंज २५ आणि डिग्रस बु. येथे २५ , तर सेनगाव आणि हिंगोली तालुक्यातील धानोरा ३३, वडहिवरा ४२, भोगाव २६, सवड ११ आणि कडती २६ अशा एकूण ३०१ शेतकऱ्यांची निवड केली आहे. निवडलेल्यांपैकी २२४ शेतकऱ्यांच्या प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली. तर प्रस्तावांना कळमनुरी तहसीलदारांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. हिंगोली, वसमत, सेनगाव येथील १४९ शेतकऱ्यांची माहितीव प्रस्ताव संबंधित तहसीलदारांकडे पाठवूनही मंजुरी दिली नसल्याने पुढील कारवाई थांबली आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने अजून तरी तुती लावगडीस सुरुवात झालेली नाही. मात्र जुलै महिन्यात तुती लावगडीस गती येणार आहे. त्यापूर्वी या प्रस्तावांना मंजुरी देणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास तुतीचे क्षेत्र दुप्पट होण्यास मदत होणार आहे. मनरेगा योजनेत लागवडीचे काम करावे लागत असल्याने त्यास तहसीलदारांची मंजुरी आवश्यक आहे.जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयात ६ पदे मंजूर असले तरी केवळ दोघांवरच जिल्ह्याची मदार आहे. यात एक व्यवस्थापक आहेत. तर दुसरा कर्मचारी. दिवसेंदिवस शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत असल्याने या कार्यालयात माहिती विचारण्यास येत आहेत. मात्र शेतकऱ्यांना माहिती देणेही कठीण होत आहे.