शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उंडणगाव येथे मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:40 IST

प्रणाली जाधव आत्महत्या प्रकरण : गाव १०० टक्के बंद; विविध मागण्यांचे निवेदन सादर

उंडणगाव : प्रणाली जाधव अमर रहे, नराधम लिपिकाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, शालेय मुलींना सुरक्षित शिक्षण मिळावे, या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणाचा तपास प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावा आदी घोषणा देत येथे शनिवारी मूकमोर्चा काढून गावात १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला. या मूकमोर्चात शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींसह संपूर्ण गाव सहभागी झाले होते.उंडणगाव येथील विद्यार्थीनी प्रणाली कृष्णा जाधव हिने ५ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयातील एका लिपिकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी येथे ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून मूकमोर्चात सहभाग घेतला. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयापासून या मूकमोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात विविध घोषणांनी प्रत्येकाचे मन हेलावून गेले होते. मोर्चात शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, तरूण, तरूणी, गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गावातील बाजारपेठ भागातील मारुती मंदिरासमोर मोर्चा आल्यानंतर विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून विविध समस्या व मुलांपासून होणाºया त्रासाचा पाढाच वाचला. यानंतर विद्यार्थिनींच्याच हस्ते अजिंठा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर, नायब तहसीलदार सोनवणे, तलाठी कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात प्रत्येकाने डोक्याला काळ्या फिती लावल्या होत्या.मूकमोर्चातील प्रमुख मागण्याया संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी,या प्रकरणाचा तपास प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावा,विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सुरू करावी, दामिनी पथकाची स्थापना करून मुलींचे रक्षण करावे, प्रणाली जाधवच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाºया लिपिकास कठोर शिक्षा व्हावी.