शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयस निर्वळची आशियाई ट्रायथलॉन स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:24 IST

हाँगकाँग येथे ४ ते ६ मेदरम्यान होणाऱ्या आशियाई ज्युनिअर ट्रायथलॉन स्पर्धेसाठी औरंगाबादच्या श्रेयस निर्वळ याची भारतीय संघात निवड झाली आहे. आशियाई स्पर्धेत १४ देश सहभागी होत आहेत. आशियाई स्पर्धेत सहभागी होणाºया भारतीय संघात श्रेयस निर्वळ (औरंगाबाद), अनुजा उगले (नाशिक), रॉबिनसिंग (राजस्थान), मोनिका नागपुरे (गुजरात) यांचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक म्हणून मुंबईचे डॉ. दयानंद कुमार यांची निवड करण्यात आली आहे.

औरंगाबाद : हाँगकाँग येथे ४ ते ६ मेदरम्यान होणाऱ्या आशियाई ज्युनिअर ट्रायथलॉन स्पर्धेसाठी औरंगाबादच्या श्रेयस निर्वळ याची भारतीय संघात निवड झाली आहे. आशियाई स्पर्धेत १४ देश सहभागी होत आहेत.आशियाई स्पर्धेत सहभागी होणाºया भारतीय संघात श्रेयस निर्वळ (औरंगाबाद), अनुजा उगले (नाशिक), रॉबिनसिंग (राजस्थान), मोनिका नागपुरे (गुजरात) यांचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक म्हणून मुंबईचे डॉ. दयानंद कुमार यांची निवड करण्यात आली आहे.आशियाई ट्रायथलॉन स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा श्रेयस निर्वळ हा पहिला औरंगाबादचा खेळाडू आहे. या स्पर्धेत श्रेयस हा ७५0 मीटर जलतरण, १९.२५ कि. मी. सायकलिंग व ५ कि. मी. रनिंग अशा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. याआधी श्रेयसने गतवर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत कास्यपदक जिंकले आहे. याच वर्षी भारतीय संघाच्या शिबिरासाठीदेखील त्याची निवड झाली आहे. या वर्षी त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत कास्यपदक जिंकले होते. या स्पर्धेनिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत औरंगाबाद जिल्हा ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष आ. अतुल सावे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या वेळी सायकल ट्रॅक उभारण्याचा मानस सावे यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष अभय देशमुख यांनी औरंगाबाद शहरात रनिंग, स्विमिंग आणि सायकलिंग अशा तिन्हींची एकाच जागी सरावासाठी व्यवस्था होण्याची आशा व्यक्त केली. या प्रसंगी औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी श्रेयस निर्वळ याला स्पर्धेसाठी आर्थिक साह्य केले. या वेळी जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. संदीप जगताप, प्रदीप खांड्रे, अशोक काळे, अंकुशपालसिंग पाल, नामदेव सोनवणे, संदीप चव्हाण, सीमा देशमुख, मीनाक्षी यादव, योगेश पालकर, श्रीनिवास मोतियळे, चरणजितसिंग संघा आदी उपस्थित होते.