औरंगाबाद : किराडपुरा येथील श्रीरामचंद्र मंदिरातून सायंकाळी श्रीप्रभू रामचंद्राची शोभयात्रा काढण्यात आली. ‘सियावर रामचंद्र की जय’ अशा जयघोषात मंदिरातून श्रीप्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता व हनुमानाच्या मूर्ती सजविलेल्या रथात आणण्यात आल्या. यानंतर देवळाई येथील पोलीस पाटील हरिभाऊ रसाळ यांच्या हस्ते रथाचे पूजन व आरती करण्यात आली. यानंतर वाजतगाजत शोभायात्रेला सुरुवात झाली. वर्षभरात एकदाच श्रीरामनवमीला श्रीरामचंद्र भगवंत भाविकांच्या भेटीला मंदिराबाहेर पडत असतात. शोभायात्रा सिडको एन-६ येथील मथुरानगर, संभाजी कॉलनीमार्गे आविष्कार कॉलनीत आली. रामभक्तांनी रस्त्यावर सडा टाकला होता. महिलांनी सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या. शोभायात्रेत दर्शन घेणाऱ्या भाविकांना बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात येत होता. भाविक ‘सियावर रामचंद्र की जय’ अशा जयघोष करीत होते. साईनगर, गुलमोहर कॉलनी, बजरंग चौक, माता मंदिरमार्गे रात्री शोभायात्रा किराडपुऱ्यातील मंदिरात येऊन पोहोचली. राजनगरशहानूरवाडी परिसरातील राजनगरात सकाळी १० वाजता हभप रामदासी महाराजांच्या कीर्तनाला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता येथे रामजन्माची आरती करण्यात आली. परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी येथे गर्दी केली होती. श्रीरामनगरश्रीरामनगरमधील राममंदिरात सकाळी हभप अनुराधा पिंगळीकर यांचे श्रीरामजन्मावरील कीर्तन झाले. रामजन्माची सामूहिक आरती झाल्यानंतर बासरीवादक बाबूराव दुधगावकर यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री स्वरसाधना ग्रुपच्या वतीने गीत रामायण कार्यक्रम सादर करण्यात आला. दीपनगर दीपनगरमध्येही श्रीराम नवमीनिमित्त हडको परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येने जमा झाले होते. दुपारी नगरसेविका स्वाती नागरे व किशोर नागरे यांच्या हस्ते श्रीरामचंद्रांची आरती करण्यात आली. यावेळी अध्यक्ष टी. टी. पाटील, हेमंत कुलकर्णी, गणेश साभरकर, सी. डब्ल्यू. पवार, सोमनाथ जाधव, आर. बी. पाटील, मंगेश कांबळे आदींची उपस्थिती होती. रात्री ८ वाजता क्षमा नांदेडकर यांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले होते. समर्थनगर समर्थनगर येथील श्रीराम मंदिरात सकाळी श्रीराम रोडे यांचे कीर्तन रंगले. श्रीरामजन्माच्या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष ज्योती चिटगोपेकर व डॉ. प्रदीप चिटगोपेकर यांच्या हस्ते आरती करण्यत आली. यावेळी सीमा रिसबूड, सुषमा धांडे, कृष्णा पाडळकर, अॅड. प्रशांत पालीमकर, अरुण जोशी, सदानंद मिरजगावकर, विनिता पानसे, रघुवीर जोशी, श्रीराम धानोरकर, मानसी याडकीकर आदींची उपस्थिती होती. मंदिर परिसरात दत्ताजी भाले रक्तपेढीतर्फे रक्तदान घेण्यात आले. उद्या १६ रोजी सकाळी ७ वाजता श्रीच्या मूर्तीची पालखी निघणार आहे.अमृतेश्वर राममंदिरकुंभारवाडा येथील ८७ वर्षे जुने अमृतेश्वर राममंदिरात पारंपरिक पद्धतीने रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. येथे सकाळी अपूर्वा मुळे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी १२ वाजता विघ्नहर्ता क्रीडा मंडळाच्या ढोल-ताशांच्या निनादाने सर्व परिसर दुमदुमला होता. येथील पूजारी सुहास व्यवहारे, प्रांजल व्यवहारे, गोविंद व्यवहारे यांनी भगवंतांची विधीवत पूजा करून आरती केली. अंजनीनगर देवळाई परिसरातील अंजनीनगर येथील रामकृष्ण मंदिरातही श्रीरामनवमीसाठी पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी सुरू झाली होती. या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त येथे ८ एप्रिलपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन सुरू आहे. आज रामजन्मोत्सवाचे कीर्तन सद्गुरू विजयानंद महाराज यांनी केले. यावेळी सामूहिक आरती करण्यात आली. दुपारी अनुपानंद महाराजांनी वाल्मिकी रामायण सांगितले. यावेळी बाळासाहेब पिल्ले, शंकरराव सूर्यवंशी, चंद्रकांत गौरे यांच्यासह परिसरातील भाविकांची गर्दी झाली होती. कैलासनगरकैलासनगरातील श्रीराम देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. यात भगवा फेटा बांधून महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. श्रीराम मंदिरात दुपारी श्रीरामजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. सजविलेल्या पाळण्यात श्रीरामाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यावेळी महिलांनी जन्मोत्सवाचे गाणे गायले. नगरसेविका आशा भालेराव व नरेश भालेराव यांनी श्रीरामाची आरती केली. सायंकाळी ७.३० वाजता वाजत गाजत श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही भगवा फेटा बांधून या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. विविध धार्मिक गाण्यांवर युवक नृत्य करीत होते. शोभायात्रा कैलासनगर, जालना रोड, मोंढानाका, लक्ष्मण चावडी, मार्गे श्रीराम मंदिरात पोहोचली. या शोभायात्रेत श्रीराम देवस्थान विश्वस्त मंडळाचे पी. बी. पैठणकर, उत्तमराव लोखंडे, रामेश्वर लोखंडे, दिलीप अग्रवाल, दिगंबर उदावंत, दगडूदास वैष्णव, सचिन माठे, संदीप फुले, गणेश अंबिलवादे, बाळू माडजे, रोहित उदावंत, रितेश कोठाळे, अमोल भालेराव, भगवान उंटवाल, रवी पैठणकर, योगेश दिवटे, गौरव राऊत, लौकिक अडणे, छाया भालेराव, अशोक भालेराव, राजेंद्र दानवे, संजय लोहिया, सुभाष राजपूत, रवी लोढा यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.
श्रीरामचंद्र भाविकांच्या भेटीला
By admin | Updated: April 16, 2016 01:48 IST