शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वेध श्रावणाचे! चल गं बाई खेळू या, मंगळागौर खेळू या...

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 10, 2023 20:08 IST

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील गाण्यावर महिला मंडळांचा सराव

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक महिलेला आपली कहाणी वाटावी, असा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील सर्वच गाणी हिट ठरली आहे. त्यातील ‘चल गं बाई खेळू या, मंगळागौर खेळू या’ हे गाणे पाहिल्यापासून महिलांना श्रावणाचे वेध लागले आहेत. कधी एकदा श्रावण मंगळवार येते व सर्वजणी मिळून मंगळागौर खेळतो, अशी भावना प्रत्येकीच्या मनात निर्माण झाली आहे. या गाण्याची क्रेझ बघून महिला मंडळांनीही याच गाण्यावर नृत्याचा सराव सुरू केला आहे.

महिला कधी करतात प्रॅक्टिसशहरात मंगळागौरीचे खेळ खेळणारे दहापेक्षा अधिक महिला मंडळ तयार झाले आहेत. या मंडळांमध्ये ज्या महिला आहेत त्यातील बहुतांश महिला या नोकरी करणाऱ्या आहेत. काही महिला गृहउद्योग सांभाळून सायंकाळच्या वेळी प्रॅक्टिसला येतात. ज्या महिला घरकाम करतात त्या दुपारच्या वेळीस प्रॅक्टिस करतात. घरसंसार, नोकरी, उद्योग संभाळून या महिला प्रॅक्टिस करतात.

मंगळागौरीच्या गाण्यातून सामाजिक संदेशआम्ही मंगळागौरीच्या गाण्यावर नृत्य करण्याची प्रॅक्टिस करत आहोत. दरवर्षी या खेळात नावीन्य आणले जाते. यंदा ‘बाईपण भारी देवा’तील मंगळागौरीच्या गाण्यावर आम्ही सराव करत आहोत. त्यातून सामाजिक संदेश मिळेल.- अनुराधा पुराणिक, ओंजळ ग्रुप

कोणाच्या घरी असतो मंगळागौरीचा सण?श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौर सण साजरा केला जातो. मंगळागौरीचे व्रत केल्याने नवविवाहितेला अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभते, अशी धारणा आहे. ज्यांच्या घरी सुनेची पहिलीच मंगळागौर आहे. अशा घरात तसेच त्या विवाहितेच्या माहेरी मंगळागौर सण थाटामाटात साजरा केला जातो. लग्नानंतर पुढील पाच वर्षे ही मंगळागौर खेळण्याची प्रथा आहे.

कोणत्या तारखांना आहे मंगळागौर पूजन?पहिले मंगळागौर पूजन - २२ ऑगस्टदुसरे मंगळागौर पूजन-२९ ऑगस्टतिसरे मंगळागौर पूजन- ५ सप्टेंबरचौथे मंगळागौर पूजन - १२ सप्टेंबर

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद