बीड:जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह तिघांना शनिवारी कार्यकारी अभियंत्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली़ कनिष्ठ अभियंता एऩ व्ही़ मिसाळ, वरिष्ठ सहायक ए़ एम़ ढोकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पी़ एस़ कासेपूरकर यांचा समावेश आहे़ बांधकाम विभागामार्फत केल्या जाणार्या कामांची तांत्रिक माहिती तसेच मासिक प्रगती अहवाल वेळेत सादर केला नाही, असा या तिघांवर ठपका आहे़ वारंवार सांगूनही माहिती न दिल्याने या नोटिसा बजावल्या आहेत़ याबाबत कार्यकारी अभियंता एस़ आऱ शेंडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यास दुजोरा दिला़ (प्रतिनिधी)
कनिष्ठ अभियंत्यासह तिघांना कारणे दाखवा नोटीस
By admin | Updated: June 1, 2014 00:30 IST