शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

२१ शिक्षकांना कारणे दाखवा

By admin | Updated: January 7, 2015 01:02 IST

बीड : मुकबधिर व मतिमंद निावसी विद्यालयातील शिक्षक, संस्थाचालक यांच्यातील वाद चिघळला आहे. पूर्वकल्पना न देता विद्यालयात गैरहजर राहून उपोषण करणाऱ्या

बीड : मुकबधिर व मतिमंद निावसी विद्यालयातील शिक्षक, संस्थाचालक यांच्यातील वाद चिघळला आहे. पूर्वकल्पना न देता विद्यालयात गैरहजर राहून उपोषण करणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांना सोमवारी संस्थेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दुसरीकडे सीईओ नामदेव ननावरे यांनी संस्थेला नोटीस धाडली आहे.राजे संभाजी बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेचे बीड येथे रुख्माईगोविंद मतिमंद निवासी तसेच मुकबधिर निवासी विद्यालय आहे. या दोन्ही संस्थांमधील काही कमर्चारी १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. मात्र, उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी संस्थेला कळविले नाही. परिणामी शालेय व्यवस्थापन कोलमडले. मुकबधीर व मतिमंद विद्यार्थी हे सर्वसाधारण विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे त्यांची विशेष देखभाल करावी लागते. दोन्ही संस्थेतील विद्यार्थी निवासी असताना त्यांच्या सेवासुश्रूषेचा विचार न करता कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याचे नोटिशीत संस्था सचिव शिवाजी चव्हाण यांनी नमूद केले आहे. यांना बजावली नोटीस...रुख्माईगोविंद मतिमंद विद्यालयातील ९ तर मुकबधिर विद्यालयातील १२ जणांना संस्थेने नोटिसा दिल्या. मतिमंद विद्यालयातील वरिष्ठ अधीक्षक सुभाष निर्मळ, शिक्षक गोरख डिसले, मेघा शिंदे, गणेश शिंदे, मनोहर करांडे, लिपीक विजय बन्सोडे, काळजीवाहक गोपीनाथ काळकुटे, अजम पठाण, सफाईगार शाहू चांदणे यांचा समावेश आहे. मुकबधिर विद्यालयामधील आर. एस. पाटील, आर. आर. शिंदे, बी. बी. ढगे, ए.एस. भराडे, आर. व्ही. जाधव, आर.आर. खांडे, एम. के. शिंदे, एस. व्ही. राठोड, वाय. एस. शिंदे, बी. बी. तोटे, आर. डी. गर्कळ, ए. जे. पोकळे यांचा समावेश आहे.संस्था बंद पाडण्याचा डावराजे संभाजी बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेचे सचिव शिवाजी चव्हाण यांनी उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांनी संस्थेला वेठीस धरल्याचा आरोप केला आहे. संस्था बदनाम करुन बंद पाडण्याचा त्यांचा डाव असल्याचा दावाही त्यांनी केला़ विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत परंतु शिक्षक खोडा घालतात, असे ते म्हणाले़