हिंगोली : जिल्हा परिषदेत शुक्रवारी जल व्यवस्थापन समितीच्या झालेल्या बैठकीत जि. प. लघूसिंचन विभागाच्या ५७ लाख रुपयांच्या तर ओटीएसपीच्या ८७ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जल व्यवस्थापन समितीची जि. प. मध्ये बैठक घेण्यात आली. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, कृषी सभापती राजाभाऊ मुसळे, शिक्षण सभापती रंगराव कदम, महिला व बालकल्याण सभापती निलावती सवंडकर, सदस्य यशोदाताई राठोड, शोभाताई देशमुख, कार्यकारी अभियंता यंबडवार, उपअभियंता मधुगोळकर आदींची उपस्थिती होती.बैठकीस अनुपस्थित असलेले भू-वैज्ञानिक यादगिरे, औंढा येथील उपअभियंता सलीम यांच्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. पुढील बैठकीला हे अधिकारी उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी लघूसिंंचन विभागाच्या ५७ लाखांच्या आराखड्यास तसेच ओटीएसपीच्या ८७ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.शासनाने या पुढील काळात पाणीपुरवठा योजनासाठी १० टक्के लोकवाट्याची अट रद्द करण्यात आली असल्याचा आदेश यावेळी अधिकाऱ्यांनी वाचून दाखविला. (जिल्हा प्रतिनिधी)
लघूसिंचन, ओटीएसपीच्या आराखड्यास मिळाली मंजुरी
By admin | Updated: July 19, 2014 00:46 IST