शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तुकडीवाढ समित्यांमध्ये सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:42 IST

विद्यापीठातर्फे महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षात तुकडीवाढ देण्याच्या संदर्भात समित्या पाठविण्यात येत आहेत. या समित्यांच्या टी.ए.,डी.ए.पोटी हजारो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केला.

ठळक मुद्देविद्यापीठ : एकाच महाविद्यालयात चार-चार समित्या; दुष्काळात पैशांची उधळपट्टी

औरंगाबाद : विद्यापीठातर्फे महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षात तुकडीवाढ देण्याच्या संदर्भात समित्या पाठविण्यात येत आहेत. या समित्यांच्या टी.ए.,डी.ए.पोटी हजारो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनातर्फे महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० वर्षाच्या विस्तारीकरणांतर्गत होणाऱ्या तुकडी वाढीच्या अनुषंगाने समित्या पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एका महाविद्यालयातील विविध शाखांच्या प्रत्येक तुकडीसाठी चार सदस्यांची स्वतंत्र समिती पाठविण्यात येत आहे. या समितीमध्ये प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश असून, या चौघांच्या डी.ए.सह प्रवास भत्त्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यात येत आहेत. एका महाविद्यालयात एकच समिती गेली पाहिजे. या समित्या पाठविताना सर्व घटकातील प्राध्यापकांचा विचार केला पाहिजे. मात्र, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर हे दबावात काम करत असून, विशिष्ट गटाच्या, जातीच्या प्राध्यापकांनाच समित्यांवर पाठवत असल्याचा आरोपही व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. याविषयी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना दिलेल्या निवेदनावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण, बामुक्टोचे सचिव डॉ. विक्रम खिलारे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. हंसराज जाधव आदींनी स्वाक्षऱ्या आहेत. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.चौकट,बामुक्टो, बामुक्टा आंदोलन करणारविस्तारीकरणांतर्गत समित्यांमध्ये विशिष्ट महाविद्यालयातील प्राध्यापकांचा भरणा करणे, सेवाज्येष्ठतेचा विचार न करणे अशी बेकायदेशीर प्रक्रिया होत आहे़ या प्रक्रियेतील सावळा गोंधळ आणि दोषींवर कारवाईसाठी बामुक्टो, बामुक्टा आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ