शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

आता औरंगाबादमध्ये सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने उघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:05 IST

३१ मेपर्यंत जीवनावश्यक वस्तू दुकानास सवलत

ठळक मुद्देमनपा प्रशासकांचे खंडपीठात तोंडी निवेदन लॉकडाऊनचे सर्व नियम लागू राहणार

औरंगाबाद :  जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बुधवारपासून (दि. २७) दररोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहतील, असे तोंडी निवेदन मनपा प्रशासकांतर्फे मंगळवारी खंडपीठात करण्यात आले. याचिकेचा उद्देश सफल झाल्यामुळे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी मंगळवारी, दि. २६ मे रोजी याचिका निकाली काढली.

१५ मेच्या मध्यरात्रीपासून जीवनावश्यक वस्तूंची विक्री व खरेदीवर २० मेपर्यंत पूर्णपणे बंदी घालणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या तोंडी सूचनावजा आदेशाला  आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणी वेळी अ‍ॅड.  संतोष चपळगावकर यांनी वरीलप्रमाणे निवेदन केले. तसा आदेश मनपा आयुक्त मंगळवारी जारी  करीत  आहेत. वरील ७ तासांपैकी  सकाळी दुकाने  उघडल्यानंतर अर्धा तास आणि दुपारी दुकान बंद करण्या  पूर्वी अर्धा तास, असा एकूण एक तास दुकानाची साफसफाई  आणि सामानाची व्यवस्था  लावता  येईल. नागरिक आणि दुकानदारांना सोयीच्या वेळेत सूट देण्याची अपेक्षा  खंडपीठाने  शुक्रवारी (दि.२३) व्यक्त केली होती.

सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सूट का देत नाही?  ज्यामुळे  नागरिकांना  जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी  पुरेसा  वेळ मिळेल आणि गर्दी होणार नाही, अशी विचारणा खंडपीठाने केली होती, तसेच वेळ वाढवून देण्याची विनंती याचिकाकर्त्यानेही केली होती. त्यावरून मनपा प्रशासकांनी मंगळवारी वरीलप्रमाणे निवेदन केले. लोकांच्या  आणि दुकानदारांच्या  सोयीसाठी न्यायमूर्तीद्वय  काही  मार्गदर्शक सूचना  करणार आहेत. त्यासह  सविस्तर आदेश बुधवारी (दि. २७) दिला जाईल,  असे खंडपीठाने सूचित केले.

लॉकडाऊनचे सर्व नियम लागू राहणारमहापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दुपारी अध्यादेश काढून किराणा दुकान आणि भाजीपाला खरेदी- विक्रीला दुपारी २ वाजेपर्यंत मुभा दिली. ३१ मेपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. आदेशात म्हटले आहे की, सकाळी ७ ते ७.३० आणि दुपारी १.३० ते २ हा वेळ दुकाने, हातगाड्या उघडणे व बंद करण्यासाठी राखीव आहे. सुरक्षित अंतर राखणे,  नियमित मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.  यावेळी गर्दी होणार नाही, परिसर वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद