शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! एकाच क्रमांकाच्या चक्क दोन ट्रक; आधी पकडले बनावट, नंतर दुसरे वाहनही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 19:37 IST

Two trucks of the same numbe plate बनावट नंबर प्लेट लावून बिनधास्तपणे वाहन चालविण्याचे प्रकार होत आहे.

ठळक मुद्देबनावट क्रमांक असलेले वाहन गेल्या सहा महिन्यांपासून जप्त आहे.

औरंगाबाद : एकच क्रमांक असलेले दोन ट्रक असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बनावट नंबर असलेला ट्रक जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता खरा क्रमांक असलेले वाहन आरटीओ कार्यालयाच्या ओव्हरलोड कारवाईत सापडले आहे.

शहरामध्ये जुलै महिन्यात आरटीओच्या भरारी पथकाने ओव्हरलोडच्या कारवाईत एक ट्रक जप्त केला. त्यावेळी आरटीओ कार्यालयाने मेमो दिले. तेव्हा खरा क्रमांक असलेल्या वाहनमालकाला बनावट क्रमांकाचेही वाहन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लक्ष ठेवून बनावट क्रमांक टाकून चालविणारे वाहन पकडून सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले. सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर आरटीओ कार्यालयाने हे बनावट क्रमांक असलेले वाहन जप्त केले.

बनावट क्रमांक असलेले वाहन गेल्या सहा महिन्यांपासून जप्त आहे. दरम्यानच्या काळात आरटीओ कार्यालयाच्या पथकाला कारवाई करताना खरा नंबर असलेले वाहनही ओव्हरलोड वाहतूक करताना आढळून आले. त्यामुळे आता खरा क्रमांक आणि खोटा क्रमांक असलेली दोन्ही वाहने जप्त आहेत. बनावट क्रमांक टाकलेल्या वाहनाप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.

तपासणी झाली तर बोगसगिरी उघडबनावट नंबर प्लेट लावून बिनधास्तपणे वाहन चालविण्याचे प्रकार होत आहे. तपासणी झाली तरच अशी वाहने सापडतात. कारवाईचे प्रमाण कमी असल्यानेच अशाप्रकारे नियमांकडे दुर्लक्ष करून अशी वाहने सुसाट धावत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस