शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सामुहिक अत्याचार नाही; मदतीच्या बहाण्याने रिक्षाचालकाने केले अल्पवयीन मुलीचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 20:18 IST

८ जानेवारी रोजी रात्री चिकलठाणा रेल्वेस्थानक येथे बेवारस अवस्थेत आढळलेल्या १६ वर्षीय मुलीने दिलेल्या माहितीनुसार, उस्मानपुरा पोलिसांनी अज्ञात तीन आरोपीवर सामूहिक अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देमदतीच्या बहाण्याने अनोळखी रिक्षाचालकाने तिला त्यांच्या घरी नेले. स्वतःच्या घरात तिच्यावर बळजबरीने अनेकदा अत्याचार केले

औरंगाबाद: चिकलठाणा रेल्वेस्थानक येथे बेवारस अवस्थेत आढळलेल्या १६ वर्षीय परप्रांतीय पिडीत मुलीने दिलेल्या माहितीमधून नवा खुलासा झाला आहे. रेल्वेस्थानकावर तीन नराधमानी नव्हे तर तिच्यासोबत बळजबरीने लग्न लावून स्वतःच्या घरी ठेवणाऱ्या नराधम रिक्षाचालकाने तीचे लैंगिक शोषण केल्याचे पोलीस तपासांत समोर आले असून पोलीस त्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

याविषयी वरिष्ठ सुत्राने सांगितले की, ८ जानेवारी रोजी रात्री चिकलठाणा रेल्वेस्थानक येथे बेवारस अवस्थेत आढळलेल्या १६ वर्षीय मुलीने दिलेल्या माहितीनुसार, उस्मानपुरा पोलिसांनी अज्ञात तीन आरोपीवर सामूहिक अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदविला. पिडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या छायाचित्रण तपासले असता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही. 

यानंतर पोलिसांनी डॉक्टरांसमोर तिच्याकडे या घटनेविषयी पुन्हा विचारपूस केली असता, तिने तिघांनी अत्याचार केल्याचे आपण घाबरून सांगितल्याचे नमूद केले. मदतीच्या बहाण्याने अनोळखी रिक्षाचालकाने तिला त्यांच्या घरी नेले. यानंतर त्याने तिच्या मनाविरुद्ध मंदीरात नेऊन लग्न केले. यानंतर त्याने स्वतःच्या घरात तिच्यावर बळजबरीने अनेकदा अत्याचार केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. तिचा नव्याने जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी अत्याचारी रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. आरोपीचे घर कोणत्या कॉलनीत आहे हे मात्र पिडितेला सांगता आले नाही. मात्र त्याच्या घराचे वर्णन आणि त्याचे आई वडिल त्याच्या घरी असतात असे सांगितले.