शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

वंचितचे धक्कातंत्र, ऐनवेळी स्वतःच्या उमेदवारालाच नाकारला 'एबी' फॉर्म

By सुमेध उघडे | Updated: April 24, 2024 19:21 IST

औरंगाबादमधून माजी नगरसेवक अफसर खान आता अपक्ष लढणार आहेत

छत्रपती संभाजीनगर: वंचित बहुजन आघाडीने काही जागांवरचे उमेदवार बदलल्यानंतर आता आणखी एक धक्का दिला आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी जाहीर केलेले उमेदवार अफसर खान यांना वंचितने एबी फॉर्म नाकारला आहे. यामुळे अफसर खान आता उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक अफसर खान यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी प्रचार देखील सुरू केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडी, महायुतीच्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, एबी फॉर्म नाकारत वंचितने अफसर खान यांना मोठा धक्का दिला आहे. उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर काही ठिकाणी लागलीच उमेदवार बदल वंचितने केला आहे. त्यानंतर आता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना थेट एबी फॉर्म नाकारत वंचितने उमेदवारास धक्का दिल्याने राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे. अफसर खान आता लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहेत. उद्या ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

वंचित नवा उमेदवार देणार का?काही दिवसांपूर्वी एमआयएमने अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर एमआयएमचे उमेदवार खासदार जलील यांच्या विरोधातील उमेदवारास एबी फॉर्म वंचितने नाकरला. यामुळे वंचित आता दूसरा उमेदवार देणार की एमआयएमच्या उमेदवारास पाठिंबा देणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

वंचितने 'या' ठिकाणी बदलले उमेदवारराज्यात सर्वात प्रथम लोकसभेसाठी वंचितने उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर वंचितने काही ठिकाणी  उमेदवार बदलले. रामटेक, वाशिम- यवतमाळ, परभणी, दिंडोरी येथे पक्षाने उमेदवार बदलले आहेत. तर आता औरंगाबादच्या उमेदवारास शेवटच्या क्षणी थेट 'एबी' फॉर्म नाकारत वंचितने पुन्हा एकदा नवीन राजकीय फासे टाकले आहेत.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४