शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धक्कादायक ! नागरिकत्व मिळण्यापूर्वीच परदेशी नागरिकांना पॅन, आधार कार्ड सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 20:21 IST

माहिती अधिकारात समोर आली माहिती 

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यातमनपाने दिले विवाह नोंदणी प्रमाणपत्र

औरंगाबाद : भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच शहरातील काही पाकिस्तानी व इतर नागरिकांकडे पॅन, आधार कार्ड, पालिकेचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र येथील शासकीय यंत्रणांनी दिल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. चिरीमिरीसाठी पॅन, आधार कार्ड देण्यासाठी नेमलेल्या एजन्सीज्मार्फत हा सगळा प्रकार सुरू असल्याचे दिसते आहे. तर मनपाकडून देण्यात येणारे विवाह नोंदणी प्रमाणपत्रदेखील खाबूगिरी करणारे मिळवून देत असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

याप्रकरणी सुहास वानखेडे यांनी माहिती अधिकारांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २०१४-२०१९ दरम्यान भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी केलेल्या अर्जासंबंधी विचारणा केली. त्यात असे आढळून आले की, भारतीय नागरिकत्व मिळण्याअगोदरच पाकिस्तानी नागरिकांच्या अर्जाला आधार कार्ड, पॅनकार्ड, लग्न प्रमाणपत्रांची कागदपत्रे जोडलेली होती. विविध शासकीय कार्यालयांमार्फत देण्यात येणारी ही कागदपत्रे नागरिकांना मिळणे ही गंभीर बाब असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. प्रशासकीय यंत्रणा चिरीमिरीसाठी महत्त्वाची कागदपत्रे काढून देण्याच्या सुविधा पुरवीत असल्याचे दिसते आहे. प्रशासकीय यंत्रणांचा वापर करून परदेशी नागरिकांना सेवा पुरविल्या जात असतील तर यंत्रणा संशयास्पद असल्याचे दिसते. भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी पात्रतेचे निकष बघता फक्त भारतात आल्यानंतर चरित्र प्रमाणपत्रा आधारे कार्यवाही केली जाते. जिल्हाधिकारी हेच दंडाधिकारी असल्याकारणाने त्यांच्या साक्षीने अर्जदारांना शपथ दिली जाते व कार्यालयामार्फत नागरिकत्वासंबंधी प्रस्ताव गृहखात्याकडे सादर केले जातात. सगळ्या प्रस्तावांवर केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्णय घेणे अभिप्रेत आहे. नागरिकत्वासंबंधीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडूनच जातात. संकलन केंद्र म्हणून जिल्हा प्रशासन काम पाहते. शहानिशा न करता प्रशासकीय यंत्रणा महत्त्वाचे दस्तावेज परदेशी नागरिकांना उपलब्ध करून देत असतील तर हे घातक असल्याचेही वानखेडे म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गृहविभाग काय म्हणतोजिल्हाधिकारी कार्यालयात गृह विभागातील सूत्रांनी सांगितले, नागरिकत्व सिद्ध होण्यापूर्वी आधार कार्ड, पॅनकार्ड देता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नागरिकत्व प्रकरणात दोनच टप्प्यात काम होते. शपथ घेण्यासाठी संबंधित नागरिक येतात. येथे १२ वर्षे वास्तव्य झाल्यावरच नागरिकत्वाबाबत निर्णय होतो. संबंधितांचा मूळ पासपोर्ट ते परराष्ट्र मंत्रालयात सरेंडर करतात. त्यानंतर दूतावास कार्यालयाकडून त्यांची कागदपत्रे संबंधित जिल्हा प्रशासनाकडे वर्ग होतात. 

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मत असेयाप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, नागरिकत्व देण्याबाबत निर्णय झाल्यानंतरच महत्त्वाची कागदपत्रे देण्यात येतात. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादPan Cardपॅन कार्डAdhar Cardआधार कार्ड