शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! औरंगाबादमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून कोरोना लसीचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 15:03 IST

Corona vaccine : या ठिकाणाहून वापरलेले १० इंजेक्शन आढळून आले आहेत.

ठळक मुद्देसाजापूरात लस देणारा आरोग्यसेवक पकडलाकामगाराकडून प्रत्येकी ३०० रुपये घेऊन लसीकरण

औरंगाबाद : वाळूजमहानगरात आरोग्य विभागाचा कर्मचारीच लसीचा काळाबाजार करीत असल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.९) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास साजापूरात उघडकीस आली. गणेश दुरोळे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून लसीचा साठा जप्त केला आहे. प्रत्येकी ३०० रुपये घेऊन कामगारांना एका खोलीत बोलावून तो लस देत असल्याची माहिती आहे.  (Corona vaccine black market exposed in Aurangabad)

औरंगाबादमध्ये कोरोना लसीचा सातत्याने तुटवडा आहे. अशा परिस्थितीत लसीचा हा काळाबाजार पुढे आला आहे. औरंगाबाद ग्रामीण भागातील एका लसीकरण केंद्रातील लस बाहेर आणत ती लस वाळूजपासून दूर साजापूर भागातील एका खाजगी जागेत कामगारांना देण्यात येत होती, याची माहिती रांजणगाव शेणपुंजी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते निखील कोळेकर यांना मिळाली. त्यांनी या प्रकरणाची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना व प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना दिली.

माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी उपनिरीक्षक राहुल निर्वळ, पोहेकॉ. वाघ, पोहेकॉ. योगेश नाईक व पंच यांना साजापूरकडे रवाना केले. लसीकरण सुरु असतांना पोलिस पथकाने छापा मारुन दुरोळे यास ताब्यात घेतले. लस देणारा आरोग्यसेवक हा जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आहे. या ठिकाणाहून वापरलेले १० इंजेक्शन आढळून आले आहेत. आधार कार्ड आधी मागवून घेऊन त्याची नोंदणी करून पैसे घेऊन नागरिकांना लस देण्यात येत होती. दुरोळे यास लस उपलब्ध करुन देणारा दुसरा आरोग्य सेवक सय्यद अमजद यालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबाद