शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पैशासाठी ७१ वर्षीय वृद्ध मातेची मुलानेच केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 16:31 IST

नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी मारेकरी मुलाला पकडून त्याचे हातपाय बांधून पोलिसांच्या हवाली केले.

ठळक मुद्देघरगुती कारणावरून आईसोबत भांडण झाले. रागाच्या भरात त्याने आईवर  कुऱ्हाडीने घाव घातले.

औरंगाबाद : घरगुती वादातून  रागाच्या भरात ७१ वर्षीय मातेची तरुण मुलाने डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री बाळापूर येथे घडली. आरडाओरड होताच घरी धावलेल्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी मारेकरी मुलाला पकडून त्याचे हातपाय बांधून पोलिसांच्या हवाली केले.

शशिकला भिकाजी घुगे (रा. बाळापूर), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. रमेश भिकाजी घुगे (३०, रा. देवळाई रोड), असे मुलाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, मयत शशिकला या ८० वर्षीय वृद्ध पती आणि मुलांसह राहत होत्या. त्यांचा सर्वात लहान मुलगा रमेश हा वर्षभरापासून मनोरुग्णासारखा वागत आहे. तो देवळाई रोडवरील एका कॉलनीत पत्नी आणि मुलासह राहतो. त्याची पत्नी माहेरी गेल्यामुळे काही दिवसांपासून रमेश आई-वडिलांच्या घरी आला होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याचे भाऊ आणि अन्य नातेवाईक दूध विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास नातेवाईक गायी, म्हशीचे दूध काढण्यात मग्न होते. 

रमेशचे घरगुती कारणावरून आई शशिकलासोबत भांडण झाले.  रागाच्या भरात त्याने आईवर  कुऱ्हाडीने घाव घातले. शेजाऱ्यांना ही घटना निदर्शनास येताच आरडाओरड केली. यामुळे काही अंतरावरील त्यांची मुले, नातवंडे आणि सुना यांनी घरी धाव घेतली. रमेशला काहींनी  पकडून ठेवले. तरीही त्याने हाताला झटका देऊन  आईला दगड फेकून मारला. यानंतर त्याला पुन्हा पकडून  दोरखंडाने जखडण्यात आले.  घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी गंभीर जखमी शशिकला यांना घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. 

आरोपी मानसिक रुग्ण ?सूत्राने सांगितले की, आरोपी रमेश हा वर्षभरापासून मानसिक रुग्ण झाला होता. तो खाजगी कंपनीत नोकरी करायचा. दरम्यान, त्याने वर्षभरापूर्वी एका मनोरुग्णालयात दोन महिने उपचार घेतले होते. मात्र, तो जन्मदात्रीचीच हत्या करील, असे गावातील कुणाला अथवा नातेवाईकांना वाटले नव्हते.