शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांना महावितरणचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:42 IST

थकबाकीदार कृषीपंप वीज ग्राहकांच्या वसुली मोहिमेनंतर आता नांदेड परिमंडळातील थकबाकीदार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची महामोहीम सुरु करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: थकबाकीदार कृषीपंप वीज ग्राहकांच्या वसुली मोहिमेनंतर आता नांदेड परिमंडळातील थकबाकीदार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची महामोहीम सुरु करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१७ अखेर नांदेड परिमंडळात ७ लाख २३ हजार ७९३ वीज ग्राहकांकडे ४४ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे.महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व वर्षानुवर्षे थकबाकीचा वाढत जाणारा डोंगर कमी करण्याच्या हेतूने महावितरणने सर्वच स्तरावर थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची महामोहीम सुरु केली आहे. नांदेड परिमंडळातील नांदेड जिल्ह्यामधील ४ लाख २४ हजार २३० वीज ग्राहकांकडे ३१ कोटी ५६ लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच परभणी जिल्ह्यात १ लाख ८९ हजार १७५ वीज ग्राहकांकडे १२ कोटी १८ लाख तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख १० हजार ३८८ वीज ग्राहकांकडे ५७ लाख रुपये थकबाकी आहे.मंगळवारपासून सुरु झालेल्या या वसुलीच्या महामोहिमेत नांदेड जिल्ह्यातील ३७६ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला़ तर १८५१ वीज ग्राहकांनी ३५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. तसेच, परभणी जिल्ह्यातील ७५ वीज ग्राहकांची वीज कापण्यात आली तर ८७ वीज ग्राहकांनी ८ कोटी ८२ लाख रुपयांचे वीजबिल महावितरणच्या खात्यात जमा केले. नांदेड परिमंडळामध्ये काल व आज केलेल्या कारवाईत एकूण ४५१ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर १९४८ वीज ग्राहकांनी ९ कोटी १७ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी जमा केली आहे.वीज ग्राहकांपर्यंत एक युनिट वीज पोहोचवण्यासाठी जेवढा खर्च येतो त्याच्या अर्धीही रक्कम वीजग्राहकाकडून वसूल होत नाही. त्यामुळे वीजबिल थकबाकीची समस्या वाढतच चाललेली आहे. वीजबिल भरण्याकरिता महावितरणने इंटरनेट बँकिंग, मोबाईल यासह अनेक विकल्प निर्माण केलेले आहेत. या विकल्पांचा वापर करत वीजग्राहकांनी देय तारखेच्या आत वीजबिल भरुन महावितरणला सहकार्य करावे, अन्यथा वीज खंडित करण्याच्या कटू कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी केले आहे़