शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

चुकीचे वीजबिल देणार्‍या संस्थांना शॉक !

By admin | Updated: May 26, 2014 00:26 IST

हरी मोकाशे , लातूर घरगुती वीज ग्राहकांना वारंवार अतिरिक्त बिल देऊन मानसिक त्रास देणार्‍या संस्था, ठेकेदारांना महावितरणने ४ लाख ७६ हजार रुपयांचा दंड आकारुन तो वसूल केला आहे़

हरी मोकाशे , लातूर घरगुती वीज ग्राहकांना वारंवार अतिरिक्त बिल देऊन दुरुस्तीसाठी हेलपाटे मारायला लावून मानसिक त्रास देणार्‍या संस्था, ठेकेदारांना महावितरणने गेल्या वर्षभरात ४ लाख ७६ हजार रुपयांचा दंड आकारुन तो वसूल केला आहे़ विशेष म्हणजे चुकीची मीटर रीडिंग घेतलेल्या १५ संस्था, ठेकेदारांचा करारही रद्द करण्यात आला आहे़ ग्राहकांना नेहमी शॉक देणार्‍या महावितरणने ही कारवाई करुन मीटर रीडिंग घेणार्‍या संस्थांनाही झटका दिला आहे़ महावितरणने वीजबिलात नेहमी होणारा गोंधळ टाळण्यासाठी मीटर रीडिंग घेणे, बील तयार करणे आणि त्याचे वाटप करण्यासाठी खाजगी संस्थांना या कामात सहभागी करुन घेतले़ हे काम करणार्‍या खाजगी संस्थांना अथवा ठेकेदारांना प्रत्येक ग्राहकापोटी जवळपास ४ ते ४़५० पैसे महावितरण दिले जाते़ या संस्था अथवा ठेकेदारांमार्फत सुरुवातीस चांगले काम होऊ लागल्याने ग्राहकांना योग्य वीजबिल मिळत होते़ जिल्ह्यात महावितरणचे लातूर, उदगीर आणि निलंगा असे तीन विभाग असून २ लाख ८६ हजार २४८ घरगुती वीज ग्राहक आहेत़ लातूर विभागात १ लाख १६ हजार २४८, उदगीरमध्ये ९७ हजार ६३२ तर निलंगा विभागात ७२ हजार ३६८ ग्राहक आहेत़ या ग्राहकांच्या मीटरची फोटो रिडिंग घेण्यासाठी सध्या २९ संस्था, ठेकेदारांशी महावितरणने करार केला आहे़ पूर्वीच्या महामंडळाच्या कारभारापेक्षा महावितरणचे कार्य बरे आहे, अशी भावना व्यक्त करणार्‍या ग्राहकांतून गेल्या एक- दोन वर्षांपासून संताप व्यक्त होत आहे़ यात चुकीचे वीजबिल दिल्याने सोसाव्या लागणार्‍या मानसिक त्रासाच्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे़ वीजबिल दुरुस्त करून मिळावे म्हणून ग्राहकांना दर महिन्यास हेलपाटे मारावे लागत आहेत़ गेल्या वर्षभराच्या कालावधीत मीटर रिडिंग घेणार्‍या संस्था, ठेकेदारांनी लातूर विभागातील १२९९ ग्राहकांना अतिरिक्त वीजबिल दिले़ त्यातील १२८७ जणांच्या बिलात दुरुस्ती करण्यात आली़ त्यामुळे या ग्राहकांनी बिलापोटी ३९ लाख ८५ हजार रुपयांचा भरणा केला़ उदगीर विभागातील ९८७ ग्राहकांच्या बिलात चूक झाल्याने ती दुरुस्त करण्यात आली़ त्यामुळे या ग्राहकांनी २६ लाख ४५ हजार रुपयांचा भरणा केला़ निलंग्यातील १४ हजार ८२० ग्राहकांना देण्यात आलेल्या अतिरिक्त बिलाची दुरुस्ती आल्याने त्यांनी २ कोटी ६८ लाख ९७ हजारांचा भरणा केला़ नेहमी ग्राहकांनाच झटका देणार्‍या महावितरणने मीटर रिडींग घेणार्‍या संस्था, ठेकेदारावर ही कारवाई केली आहे. त्यामुळे चुकीचे बिल जाऊ नये म्हणून संस्थांच्या वतीने जोरात प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. ठेकेदारांस आकारला पावणेदोन लाखांचा दंड... वारंवार अतिरिक्त वीजबिल दिल्याने महावितरणने लातूर विभागातील संस्था, ठेकेदारास १ लाख ८० हजार रुपये दंड आकारुन वसूल केला आहे़तसेच या भागातील एका संस्थेचा करारही रद्द केला आहे़ उदगीर विभागातील संस्था, ठेकेदाराकडून ८१ हजार रुपये दंड वसूल केला आहे़ ६ संस्था, ठेकेदारांचा करारही रद्द केला आहे़ निलंगा विभागातील संस्था, ठेकेदारांकडून २ लाख १५ हजार रुपये दंड वसूल केला आहे़ ८ संस्थांचा करार रद्द केला आहे़ अतिरिक्त वीजबिलाचा सर्वाधिक त्रास निलंगा विभागातील ग्राहकांना झाला आहे़ त्यामुळे कामात निष्काळजी करणार्‍या संस्था, ठेकेदारांकडून महावितरणने २ लाख १५ हजार रुपये दंड वसूल केला आहे़ याच विभागातील ८ संस्थांचा करारही रद्द करण्यात आला आहे़ इतर विभागांच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण निलंगा विभागात सर्वाधिक आहे़ त्यापाठोपाठ करार रद्द होण्यात उदगीर आहे.दंडात्मक कारवाईत लातूर आघाडीवर आहे़ बिलवाटपाची समस्या़़़ मीटरची रिडिंग घेणार्‍या संस्था, ठेकेदाराने वीजबिल वाटप करणे बंधनकारक आहे़ परंतु, अनेक ग्राहकांना अतिरिक्त बिलाबरोबरच वेळेवर बिल मिळत नसल्याची समस्या सोसावी लागत आहे़ प्रत्येक ग्राहकास वेळेवर बिल न देणार्‍या संस्था, ठेकेदारांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा ग्राहकांतून व्यक्त होत आहे़ इन्फ्रारेड या नवीन पद्धतीने मीटर रिडींग घेण्यास सुरुवात झाली असल्याने आता मानवी चुका कमी होतील. संस्था, ठेकेदारांना महावितरणने गेल्या वर्षभरात आकारला पावणे पाच लाखांचा दंड चुकीची रीडिंग दिल्याने महावितरणने केली दंडात्मक कारवाई ग्राहकांच्या मीटरची फोटो रिडींग घेण्यासाठी २९ संस्थांचा सध्या आहे करार महावितरणने १२८७ ग्राहकांच्या बिलात केली दुरुस्ती निलंगा विभागात १४ हजार ८२० ग्राहकांना अतिरिक्त बिल दुरुस्ती होताच ग्राहकांनी केला भरणा