शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

शिवशाहू रथयात्रेमुळेच आरक्षण - मनोज आखरे

By admin | Updated: August 28, 2014 00:00 IST

नांदेड : शिवशाहू रथयात्रेमुळेच आरक्षणाची खरी लाट तयार झाली, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केले.

नांदेड : युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी काढलेल्या शिवशाहू रथयात्रेमुळेच आरक्षणाची खरी लाट तयार झाली, या दबावामुळेच शासनाला मराठ्यांना आरक्षण देणे भाग पडले, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केले.मराठा समाजाचा ई़एस़बी़सी मध्ये समावेश करून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सर्वाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २७ आॅगस्ट रोजी येथील डॉ़शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मराठा आरक्षण कृतज्ञता सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. मराठा समाजातील सर्वच संघटनांनी आरक्षणासाठी लढा दिला परंतु आरक्षणाची एकत्र मोर्चेबांधणीची ताकद युवराज संभाजी राजे व मराठा सेवासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वामुळेच तयार झाली. आरक्षणाचा लढा संपलेला नसून केंद्रातील ओबीसीत आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचे आखरे म्हणाले.ब्रिगेडीयर सुधीर सावंत म्हणाले, यश समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यामुळे तसेच मराठा समाजातील विविध संघटनाच्या लढ्यामुळे मिळाले आहे. आरक्षणाच्या लढ्यात वेगवेगळ््या संघटनेतील सहभागी झालेल्या कार्यकर्त्यावरील गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, असे म्हटले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार तर शिवराज्य पक्षाचे संस्थापक ब्रिगेडीयर सुधीर सावंत, आ़ वसंतराव चव्हाण, आ़ओमप्रकाश पोकर्णा, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष एकनाथराव पावडे, प्राग़णेश शिंदे, शिवराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी हंबर्डेे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर, डॉ.रेखा पाटील, श्यामसुंदर शिंदे याची प्रमुख उपस्थिती होती़ आरक्षणाच्या लढ्यासाठी योगदान देणाऱ्या समाजबांधवाचा गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष (उत्तर) संतोष गव्हाणे, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) माधव देवसरकर, जिल्हा सचिव मारुती देशमुख नरंगलकर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष संकेत पाटील, अवधूत कदम, गजानन कहाळेकर, भगवान कदम, मनोरमा चव्हाण, राजश्री मिरजकर, प्रा.मुकुंद कवडे, नागोराव भांगे, संदीप चव्हाण, संभाजी जाधव, बाळासाहेब देसाई, कार्तिक मुसळे, गजानन इंगोले, सुरेश मोरे, बालाजी शिंदे, तिरूपती हिवराळे, शहानंद मुधळ, किरण गव्हाणे, धनंजय सूर्यवंशी, बालाजी थडके, शिवहरी गाढे, शाम पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.संतोष देवराये यांनी केले.प्रास्ताविकात संतोष गव्हाणे म्हणाले, आरक्षणासाठी अनेक समाजबांधव जखमी झाले असून त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. शिवशाहू रथयात्रेमुळे शासनावर दबाव आल्यानंतरच आरक्षण जाहीर केल्याचे ते म्हणाले. माधव देवसरकर यांनी सर्व समाजबांधवाच्या लढ्यामुळेच आरक्षण पदरात पडल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)