शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी वाढीविरोधात शिवसेनेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:19 IST

शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाºया घरपट्टी व मालमत्ता करातील वाढी विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला असून, गुरुवारी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाºया घरपट्टी व मालमत्ता करातील वाढी विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला असून, गुरुवारी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले़परभणी महानगरपालिकेने घरपट्टी व इतर करवाढीच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयाला शिवसेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे़ ही करवाढ मागे घेवून नागरिकांना दिलेल्या नोटिसा रद्द कराव्यात, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले़ या उपोषणात खा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, कल्याणराव रेंगे, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, दशरथ भोसले, नंदकुमार आवचार, ज्ञानेश्वर पवार, संदीप भंडारी, माणिक पोंढे, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, सोपानराव आवचार, प्रभाकर जैस्वाल, जि़प़ सदस्य राम खराबे, ज्ञानेश्वर गिरी, रविंद्र पतंगे, माणिकराव घुंबरे, राजू देशमुख, गजानन देशमुख, चंदू शिंदे, अतुल सरोदे, विजय ठाकूर, प्रशास ठाकूर, सुशील कांबळे आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना आ़ डॉ़ राहुल पाटील म्हणाले की, १९९९ पासून नगरपालिका व आताच्या मनपाने कोणतीही करवाढ केलेली नाही़ अचानक कर वाढ करून नागरिकांवर बोजा टाकला जात आहे़ जाचक नोटिसा बजावून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे़ मनपाने दिलेली नोटीसच चुकीची असून, ती रद्द करावी, तसेच करवाढही स्थगित करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला़ यावेळी खा़ बंडू जाधव यांनीही मार्गदर्शन करताना मनपाची दरवाढ चुकीची असल्याचे सांगून सर्वसामान्यांवर बोजा पडू देणार नाही़ वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा दिला़ प्रशासनाच्या वतीने तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले़