शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना महिला आघाडीत फ्री स्टाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:08 IST

मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर शिवसेना महिला आघाडीतील खदखद समोर आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर शिवसेना महिला आघाडीतील खदखद समोर आली. महिला आघाडीच्या उपशहर संघटकांच्या नियुक्त्यांपासून सुरू झालेला वाद बुधवारी हातघाईवर आला.गुलमंडीवरील कार्यक्रम संपल्यानंतर नियुक्त्यांच्या वेळेच्या वादातून उपशहर संघटक राखी सुरडकर आणि मंजूषा नागरे यांच्यात फ्री स्टाईल मारामारी झाली. जिल्हा संघटकपदी रंजना कुलकर्णी यांची नियुक्ती झाल्यापासून महिला आघाडीत गटबाजीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोप राखी सुरडकर यांनी केला. यातूनच मंजूषा नागरे यांनी जुना वाद उकरून काढत कार्यक्रम संपल्यानंतर एकटीला पाहून वाद घालत हात उचलला असल्याचेही त्यांनी सांगितले. याविषयी मंजूषा नागरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. रंजना कुलकर्णी यांना याविषयी विचारले असता, त्यांनी दवाखान्यात आहे, नंतर बोलते म्हणून भ्रमणध्वनी कट केला.शिवसेना औरंगाबाद शाखेतर्फे मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुलमंडी येथे बुधवारी सकाळी ९ वाजता अभिवादन आणि सरला शिंदे व सहकाºयांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम थेट ‘मातोश्री’ घराण्याचा असल्यामुळे प्रतिवर्षी मोठ्या संख्येने पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांची गर्दी होत असे. मात्र यावर्षी व्यासपीठासमोरील पूर्ण खुर्च्या रिकाम्या होत्या. यातच उन्हाचा चटका पडताच सर्व खुर्च्या जमा कराव्या लागल्या. प्रारंभी पहिल्या रांगेत काही जण बसले होते. ११.३० वाजेदरम्यान खासदार चंद्रकांत खैरे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरू झाला. उन्हाचा चटका जाणवत असल्यामुळे खा. खैरे यांनीही शेजारील दुकानांसमोर खुर्ची टाकली. ही संधी साधत इतर कार्यकर्त्यांनी दुकानांच्या सावलीत खुर्च्या मांडल्या. दुपारी साडेबारा वाजेदरम्यान जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख प्रदीप जैस्वाल कार्यक्रमस्थळी आले. तर आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हा युवा अधिकारी ऋषिकेश खैरे, संतोष माने यांच्यासह इतर पदाधिकारीही अनुपस्थित होते. सुहास दाशरथे, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, उपमहापौर स्मिता घोगरे, गटनेते मकरंद कुलकर्णी, महिला आघाडीच्या कला ओझा, सुनीता आऊलवार, रंजना कुलकर्णी, नंदकुमार घोडेले आदी उपस्थित होते.