शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

सुधीर मुनगंटीवारांनी पुड्या सोडू नये; भविष्यात पश्चाताप न होण्याची काळजी घ्या- नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 17:32 IST

शिवसेनेच्यान नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे.

औरंगाबाद- भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा 2017 मध्येच झाली होती. मंत्रिपदंही ठरली होती. मात्र, शिवसेनेसोबत आमचं जमणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीनं सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला, असं गौप्यस्फोट भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला. तर, दुसरीकडे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही भाजपने राष्ट्रवादीसोबतच युती करायला हवी होती, आता पश्चाताप होत आहे, असे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. 

सन 2014 मध्ये आमच्यासोबत राष्ट्रवादीचा अदृश्य हात होता. पण, आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवलं. राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवण्यावर चर्चादेखील झाली. मात्र, शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत सरकार बनवावं हे आमचं मत नव्हतं. म्हणून, आशिष शेलार जे म्हणाले त्यात तथ्य आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. सुधीर मुनगंटीवारांच्या या विधानानंतर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी निशाणा साधला आहे. 

सुधीर मुंगटीवार जे बोलतात त्यांचा त्यांना भविष्यात पश्चाताप होऊ नये, येवढी काळजी त्यांनी घ्यावी, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं. तसेच सुधीर मुंगटीवार यांनी पुड्या सोडने बंद करावं, असा टोलाही नीलम गोऱ्हे यांनी लगावला आहे. 

काय म्हणाले होते आशिष शेलार?

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्या दोन वर्षांपूर्वीच अर्थात २०१७मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीसंदर्भात अंतिम बोलणी झाली होती. भाजपाला २०१७ मध्येच राष्ट्रवादीसोबत युती करावी असे वाटू लागले होते. शिवसेनेचे रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका असताना राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप असे सरकार करावे, अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. त्यानंतर पुन्हा भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ठरवले की आपण तीन पक्षांचे सरकार करू, असा घटनाक्रमच आशिष शेलार यांनी सांगितला.  

शेलारांच्या विधानावर अजित पवार म्हणाले...-

भाजपकडून 2017 मध्ये राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी होण्याची ऑफर होती. मंत्रिपदं ठरली होती. पण राष्ट्रवादीनं नकार दिला, हे सगळं आशिष शेलार आता का सांगताहेत? त्यांनी हे आधीच सांगायचं ना. पाच वर्षानंतर अचानक आता आशिष शेलारांना हे आठवलं का? इतकी वर्षे का थांबले होते?, असे प्रश्न उपमुख्यमंत्री पवारांनी उपस्थित केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारNeelam gorheनीलम गो-हे