शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीच्या मिरवणुकीने लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:35 IST

‘जयभवानी जय शिवाजी’ असा जयघोष करीत रविवार, ४ मार्च रोजी शहरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी राजाबाजार येथून निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘जयभवानी जय शिवाजी’ असा जयघोष करीत रविवार, ४ मार्च रोजी शहरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी राजाबाजार येथून निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले.राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरासमोरून सायंकाळी ७ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. यात छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांची अश्वारूढ स्वारीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यापाठीमागे भगवे फेटे घातलेल्या मुली शिस्तीत लेझीम खेळत होत्या. एका सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. त्यामागे एका वाहनामध्ये सुमारे १० फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ठेवण्यात आला होता. या पुतळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एका वाहनामध्ये शिवाजी महाराजांचा दरबाराचा सजीव देखावा तयार करण्यात आला होता. तर दुस-या वाहनात माता जिजाबाई बालशिवाजीला मार्गदर्शन करीत असल्याचा सजीव देखावाही लक्षवेधी ठरला. सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरण केले. बँडपथकांनी देशभक्तीपर गीत सादर करून मिरवणुकीत रंगत आणली. मिरवणुकीच्या प्रारंभी खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या हस्ते संस्थान गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र आदमाने, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, नगरसेवक सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, मकरंद कुलकर्णी, यशश्री बाखरिया, आनंद तांदुळवाडीकर, प्रफुल्ल मालाणी, विश्वनाथ स्वामी, बद्रीनाथ ठोंबरे आदींची उपस्थिती होती. मिरवणूक शहागंज, गांधी पुतळा चौक, सराफा रोड, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, पैठणगेटमार्गे क्रांतीचौकात पोहोचली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा-देवळाई परिसरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.