लातूर : जिल्ह्यातील दहाही तालुक्यात एप्रिलमध्ये झालेल्या गारपीठीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ फळबागांच्या क्षेत्रामध्ये शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जिरायती क्षेत्राबरोबरच ३३ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले होते़ यासंबंधीचा प्राथमिक अंदाजही कृषी विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला होता़ परंतु अंतिम अहवालात शिरूर अनंतपाळला का डावलण्यात आले? याबाबत शेतकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे़लातूर जिल्ह्यातील प्रपत्र ब नुसार लातूर तालुक्यातील २९५८ शेतकऱ्यांचे १६६६़७७ हेक्टरवरील बागायती नुकसान झाले आहे़ ४८ शेतकऱ्यांचे १८़१ हेक्टरवरील बागायती नुकसान झाले, रेणापूर तालुक्यातील ६३३ शेतकऱ्यांचे २६५़८५ हेक्टरवरील बागायतीचे नुकसान झाले आहे़ उदगीर तालुक्यातील ४६ शेतकऱ्याचे २५़०९ हेक्टरवरील बागायतीचे नुकसान झाले, अहमदपुर तालुक्यातील ३८२ शेतकऱ्यांचे १४६़०४ हेक्टरवरील बागायतीचे नुकसान झाले आहे़ चाकुर तालुक्यातील ५७ शेतकऱ्याचे २५ हेक्टरवरील बागायतीचे नुकसान झाले, देवणी तालुक्यातील ६१ शेतकऱ्यांच्या ४१़४ हेक्टरवरील बागायत, जळकोट तालुक्यातील २१० शेतकऱ्यांच्या ६०़५ हेक्टरवरील बागायत, निलंगा तालुक्यातील २ हजार ५९६ शेतकऱ्यांचे ८३२ हेक्टरवरील बागायतींचे अशा एकूण ६ हजार ९९१ शेतकऱ्यांच्या ३ हजार ८१़५८ हेक्टर क्षेत्रावरील बागायतींचे नुकसान झाले आहे़ यामध्ये शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बागायती पिकाचे नुकसान झाल्याची नोंद कृषी कार्यालयाच्या दप्तरी असतानाही जिल्हा प्रशासनाने शिरूर अनंतपाळ तालुक्याला गारपीठ अनुदानापासून डावलले असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
गारपिटीच्या अनुदानापासून शिरूर अनंतपाळ वंचित
By admin | Updated: May 25, 2015 00:27 IST