शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इज्तेमासाठी आलेल्या साडेआठ लाख वाहनांचा शिस्तीत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 10:34 IST

लिंबेजळगाव येथील तीनदिवसीय इज्तेमाचा सोमवारी दुपारी समारोप झाल्यानंतर तेथे आलेले लाखो साथी आणि सुमारे साडेतीन लाख चारचाकी आणि पाच लाख दुचाकी वाहने शिस्तीत परतीच्या प्रवासाला निघाली. विशेष म्हणजे रेल्वे आणि बसने जाणाºया साथींसाठी प्राधान्य देत एक मार्ग मोकळा ठेवल्याने त्यांचा प्रवासही सुकर झाला.

ठळक मुद्देइज्तेमासाठी देशभरातून लाखो साथी सुमारे साडेतीन ते चार लाख चारचाकी वाहने आणि पाच लाख दुचाकींनी आले होते. यातील हजारो वाहने इज्तेमाच्या आठ ते दहा दिवस आधी, तर काही वाहने इज्तेमाच्या आदल्या दिवशी आणि उर्वरित वाहने इज्तेमादरम्यान तेथे दाखल झाली होती.सर्व वाहने एकाच दिवशी परतीच्या प्रवासाला निघणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संयोजक आणि वाहतूक बंदोबस्तावरील अधिकार्‍यांनी नियोजनबद्ध वाहने सोडण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : लिंबेजळगाव येथील तीनदिवसीय इज्तेमाचा सोमवारी दुपारी समारोप झाल्यानंतर तेथे आलेले लाखो साथी आणि सुमारे साडेतीन लाख चारचाकी आणि पाच लाख दुचाकी वाहने शिस्तीत परतीच्या प्रवासाला निघाली. विशेष म्हणजे रेल्वे आणि बसने जाणार्‍या साथींसाठी प्राधान्य देत एक मार्ग मोकळा ठेवल्याने त्यांचा प्रवासही सुकर झाला.

इज्तेमासाठी देशभरातून लाखो साथी सुमारे साडेतीन ते चार लाख चारचाकी वाहने आणि पाच लाख दुचाकींनी आले होते. यातील हजारो वाहने इज्तेमाच्या आठ ते दहा दिवस आधी, तर काही वाहने इज्तेमाच्या आदल्या दिवशी आणि उर्वरित वाहने इज्तेमादरम्यान तेथे दाखल झाली होती.वेगवेगळ्या दिवशी दाखल झालेली ही सर्व वाहने एकाच दिवशी परतीच्या प्रवासाला निघणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संयोजक आणि वाहतूक बंदोबस्तावरील अधिकार्‍यांनी नियोजनबद्ध वाहने सोडण्याचा निर्णय घेतला. रेल्वे आणि एस.टी. महामंडळाच्या बसेस, ट्रॅव्हल्स बसेसने परत जाणार्‍या नागरिकांसाठी लिंबेजळगाव ते नगर नाका, महावीर चौकापर्यंत पादचारी मार्ग म्हणून खुला ठेवण्यात आला, तर दुसर्‍या मार्गावरून दुचाकी आणि कार सोडण्यात आल्या. मात्र, पादचार्‍यांची संख्या खूप जास्त असल्याने पादचार्‍यांनी कार आणि दुचाकींचा रस्ताही व्यापला होता. मात्र, पादचार्‍यांना प्राधान्य असल्याने वाहनचालकांनी त्यांना पुढे जाऊ दिले. दुपारी सुरू झालेला पादचार्‍यांचा प्रवास रात्री उशिरापर्यंत सुरू होता. महावीर चौकातून पादचारी रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक येथे गेले.

रात्रभर वाहने रस्त्यावरहजारो नागरिक ट्रकने आले होते. हे ट्रक इज्तेमाच्या वाहन पार्किंगमध्ये होते. रेल्वे, बसने जाणार्‍या साथींची संख्या कमी झाल्यानंतर अन्य वाहने सोडण्यात आली. आधी पायी जाणारे साथी, त्यानंतर दुचाकी, त्यानंतर कार आणि सर्वात शेवटी ट्रक आणि खाजगी बसेस सोडण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला.

वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रंदिवस ड्यूटीवरपोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक बंदोबस्तासाठी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उपायुक्त विनायक ढाकणे यांच्यासह तीन उपायुक्त, सहायक आयुक्त सी.डी. शेवगण यांच्यासह आठ सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, रामेश्वर रोडगे, मनोज पगारे यांच्यासह १४ पोलीस निरीक्षक, ८२ पोलीस उपनिरीक्षक आणि १ हजार ३०० वाहतूक पोलीस तैनात होते. त्यांच्या मदतीला स्वयंसेवक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत होते.

टॅग्स :Ijtema Aurangabad 2018इज्तेमा औरंगाबाद २०१८