शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी शीला भवरेंची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:02 IST

नांदेड शहराच्या पहिल्या दलित महापौर होण्याचा बहुमान काँग्रेसच्या शीलाताई किशोर भवरे यांना मिळणार आहे. काँग्रेसकडून महापौरपदाच्या चार नावांपैकी शुक्रवारी शीलाताई भवरे यांच्या नावावर काँग्रेस नेतृत्वाने मोहर उमटवताना त्यांना महापौरपदासाठी संधी दिली. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसने विनय गिरडे यांना संधी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेङ: नांदेड शहराच्या पहिल्या दलित महापौर होण्याचा बहुमान काँग्रेसच्या शीलाताई किशोर भवरे यांना मिळणार आहे. काँग्रेसकडून महापौरपदाच्या चार नावांपैकी शुक्रवारी शीलाताई भवरे यांच्या नावावर काँग्रेस नेतृत्वाने मोहर उमटवताना त्यांना महापौरपदासाठी संधी दिली. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसने विनय गिरडे यांना संधी दिली आहे.महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी मुदत होती. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार होते. काँग्रेसकडून महापौरपदासाठी गुरुवारी शीलाताई भवरे, दीक्षा धबाले, ज्योती कदम, ज्योती रायबोले यांनी अर्ज घेतले होते. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडून प्रशांत तिडके, विनय गिरडे आणि सतीश देशमुख यांनी अर्ज घेतले होते. यापैकीच महापौर आणि उपमहापौरपदाची संधी मिळणार हे स्पष्ट होते.शुक्रवारी काँग्रेसकडून महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार ठरविण्याबाबत शहरातील आयटीएम कॉलेजमध्ये प्रमुख नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर महापौरपदासाठी काँग्रेसने शीलाताई भवरे यांची निवड अंतिम केली तर उपमहापौरपदासाठी गिरडे यांना अर्ज भरण्याचे निर्देश दिले.हे आदेश मिळाल्यानंतर काँग्रेस नगरसेवकांनी महापालिका गाठली. येथे आ. राजूरकर, आ. सावंत यांच्या उपस्थितीत महापौरपदासाठी शीलाताई भवरे यांनी तर उपमहापौरपदासाठी विनय गिरडे यांनी आपले अर्ज भरले. यावेळी महापौर शैलजा स्वामी, सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, आनंद चव्हाण, उमेश पवळे, संगीता पाटील डक, संजय मोरे आदींची उपस्थिती होती.भाजपाकडूनही या दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्यात आला आहे. महापौरपदासाठी भाजपकडून बेबीताई गुपिले तर उपमहापौरपदासाठी गुरुप्रितकौर सोडी यांनी उमेदवारी दाखल केली. त्यामुळे महापौर व उपमहापौरदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.उमेदवार दाखल केल्यानंतर माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांनी काँग्रेसला नांदेडकरांनी दिलेला बहुमताचा कौल हा जबाबदारी वाढवणारा असल्याचे सांगितले. काँग्रेसने जनतेला दिलेली सर्व आश्वासने आगामी काळात पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकहाती सत्ता असली तरी ती जबाबदारीने सांभाळली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.आ. अमरनाथ राजूरकर यांनीही अशोकरावांच्या नेतृत्वावर नांदेडकरांनी विश्वास ठेवून काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिल्याचे सांगितले. आगामी काळातही काँग्रेसला जिल्ह्यात तसेच राज्यात चांगले यश मिळणार आहे़ त्याची सुरुवात नांदेडपासून झाली असल्याचेही ते म्हणाले़