नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून आऱ जी़ शेख रूजू झाले आहेत़ शेख हे मुंबई मुख्यालयातून नांदेडमध्ये बदलीवर आले आहेत़नांदेड परिमंडल कार्यालयात रूजू झाल्यानंतर शेख यांचे प्रभारी मुख्य अभियंता डी़ डी़ हामंद, शहर अभियंता डी़ एच़ अग्रवाल, हिंगोलीचे अधीक्षक अभियंता एच़ के़ रणदिवे, कार्यकारी अभियंता के़ डी़ पावरा, पी़ एम़ राजपूत आदींनी सत्कार केला़राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीनेही शेख यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी परिमंडळ अध्यक्ष प्रकाश वागरे, प्रांत उपाध्यक्ष एस़ व्ही़ पाटील, महेंद्र चुनारकर, एस़ एऩ कांबळे, यु़ व्ही़ सावळे, शेख नसीर, एस़ बी़ बुक्तरे, रेखा लोणे, कल्पना रावणगावे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
मुख्य अभियंतापदी शेख रूजू
By admin | Updated: June 13, 2014 00:38 IST