औरंगाबाद : एकेकाळी शेजारी राहत असलेल्या गीता आणि कृष्णा कदम या दाम्पत्यावर माझा मोठा विश्वास होता. या विश्वासामुळेच तीनवर्षीय मुलीला कदम दाम्पत्याकडे सोपवून गोलटगाव येथे माहेरी आले, अशी आपबिती पीडित मुलीच्या आईने पोलिसांना ऐकवली. पोलीस कारवाईचे ‘लोकमत’मधील वृत्त वाचून रडतच या महिलेने सिडको ठाणे गाठले.सिडको एन- ९ भागात घरातच कुंटणखाना व जुगारअड्डा चालविणाऱ्या कदम दाम्पत्यावर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. या दाम्पत्याच्या ताब्यातून एका तीनवर्षीय बालिकेची पोलिसांनी सुटका केली. या बालिकेच्या गुप्तांगासह सर्वांगावर सिगारेटचे तसेच जळत्या वस्तूचे चटके देण्यात आले होते. कोण आहे गीता आंटीगीता कदम ही पूर्वी बाबा पेट्रोलपंप परिसरात वेश्या व्यवसाय करीत होती. त्यानंतर कुख्यात गुन्हेगार राजू चव्हाण याची रखेल म्हणून राहण्यास तिने सुरुवात केली. राजूच्या मृत्यूनंतर ती कृष्णा कदमच्या संपर्कात आली. कृष्णा हा वेश्यांचा दलाल म्हणून काम करतो. दोघांनी सिडको एन-९ येथील रेणुकामाता मंदिरामागे तीन महिन्यांपूर्वी घर भाड्याने घेऊन देहविक्रयाचा अड्डा सुरूकेला. या ठिकाणी महिला आणि पुरुषांना जागा उपलब्ध करून दिली जात होती. तसेच बाहेर जाण्यासाठी ग्राहकांना महिला उपलब्ध करून दिल्या जात असत. घरातच ते जुगार अड्डाही चालवीत. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असे.जयभवानीनगरात झाली ओळखगीता आणि कृष्णा कदम यांच्या घरात पोलिसांनी मुक्तता केलेल्या पीडित बालिकेची आई चिकलठाण्यात राहते. या महिलेला दोन मुली आहेत. मोठी मुलगी सहा वर्षांची असून, पीडिता तीन वर्षे वयाची आहे. पतीच्या निधनानंतर आठ महिन्यांपूर्वी पीडितेची आई जयभवानीनगरात (पान २ वर)कदम आणि रोपेकर यांना मंगळवारी दुपारी चौकशीसाठी सिडको ठाण्यात आणले. यावेळी काही छायाचित्रकारांनी आरोपींचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला असता कदमने पोलीस ठाण्यात धिंगाणा घालून पोलिसांना जेरीस आणले. हा गोंधळ सुमारे अर्धातास सुरू होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास न्यायालयासमोर देखील कदमने छायाचित्रकारांच्या दिशेने चपला आणि दगडफेक केली.कदमने न्यायालयाच्या आवारातदेखील धिंगाणा घातल्याची माहिती पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचताच त्यांनी अतिरिक्त महिला पोलीस व दामिनी पथकाला न्यायालयात पाठविले. मात्र, बलदंड देहयस्टीची कदम पाच-पाच महिला पोलिसांना देखील आवरत नव्हती. शेवटी पोलिसांनी कदमला व्हॅनमध्ये बसवून हर्सूल कारागृहात पाठविले.
तिने रडतच गाठले ठाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 01:05 IST