शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जन्मभूमीच्या शोधासाठी ‘ती’ जर्मनीहून पोहचली परभणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:59 IST

आपल्या जन्मभूमीचा आणि आई-वडिलांचा शोध घेत जर्मनीमध्ये दत्तक गेलेल्या एका युवतीने थेट जर्मनीहून परभणीपर्यंतचा प्रवास केला. दिवसभर जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या जन्माचे आणि पालकांचे दस्तावेज तीने शोधले. मात्र रुग्णालयात अभिलेखे उपलब्ध नसल्याने स्वत:च्या जन्माविषयीची तिला माहिती मिळू शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आपल्या जन्मभूमीचा आणि आई-वडिलांचा शोध घेत जर्मनीमध्ये दत्तक गेलेल्या एका युवतीने थेट जर्मनीहून परभणीपर्यंतचा प्रवास केला. दिवसभर जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या जन्माचे आणि पालकांचे दस्तावेज तीने शोधले. मात्र रुग्णालयात अभिलेखे उपलब्ध नसल्याने स्वत:च्या जन्माविषयीची तिला माहिती मिळू शकली नाही.औरंगाबाद येथील शिशू सदनमधून एका जर्मन कुटुंबियांनी ४२ वर्षांपूर्वी एका मुलीस दत्तक घेतले होते. सुशिला हनमन फिश्चर असे या मुलीचे नाव असून सुशिलाने जर्मनी येथेच आपले शिक्षण पूर्ण केले. नर्सिंग कोर्स पूर्ण करुन सुशिला सध्या जर्मनी येथेच नोकरी करते. तिचे पती क्लाऊड हे एका कंपनीत नोकरीला आहेत. या दांम्पत्यास एक मुलगी आणि दोन मुले असे अपत्य आहेत. औरंगाबाद येथून दत्तक घेतलेल्या सुशिला यांना वारंवार आपल्या जन्मभूमीची ओढ लागली होती. त्यामुळे जन्मभूमी आणि आपल्या माता-पित्याच्या शोधात सुशिलाने २८ आॅक्टोबर रोजी परभणी शहर गाठले. प्रारंभी सुशिला यांनी औरंगाबाद येथील शिशू सदनमध्ये माहिती घेतली तेव्हा परभणी येथून शिशू सदनमध्ये दाखल केले असल्याचे समजले.औरंगाबाद येथील शिशू सदनातील अहवालानुसार १३ डिसेंबर १९७५ रोजी त्यांचा जन्म परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला आहे. त्यामुळे परभणी जिल्हा रुग्णालयातून जन्माविषयीची आणि आपल्या माता-पित्याची माहिती मिळविण्यासाठी त्या परभणी आल्या. या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात त्यांनी ही कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, रुग्णालयात अहवाल उपलब्ध नव्हता. त्यामुळे सुशिला अत्यंत भाऊक झाल्या होत्या. त्यांना निराश व्हावे लागले. यावेळी त्यांनी रुग्णालयातील प्रसुती कक्षास भेट देऊन तेथील महिलांशीही संवाद साधला.आणखी दोन दिवस त्या येथे थांबणार असून आपल्या माता-पित्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. शनिवारी त्यांनी नानलपेठ पोलीस ठाण्याला भेट देऊन जुन्या दस्ताऐवजांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यांना दस्ताऐवज मिळाले नाहीत.