शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘ती आणि तिच्यासाठी’ औरंगाबादेत मोपेडस्वार महिला पोलिसांचे विशेष पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 15:35 IST

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मोपेडस्वार महिला कर्मचाऱ्यांचे विशेष गस्ती पथक स्थापन करण्यात आले.

औरंगाबाद : शाळा, महाविद्यालयांतील मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मोपेडस्वार महिला कर्मचाऱ्यांचे विशेष गस्ती पथक स्थापन करण्यात आले. ‘ती आणि तिच्यासाठी’ असे या गस्ती पथकाचे नाव आहे. पहिल्या टप्प्यात आठ मोपेडवरून महिला पोलीस गस्त करणार असून, महिनाभरात ही संख्या १६ पर्यंत जाणार आहे.

याविषयी उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, शहरातील शाळा-महाविद्यालयीन मुली आणि महिलांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. पूर्वी चार्ली महिला पोलीस गस्त करीत. मात्र, चार्ली बंद झाल्यापासून केवळ दामिनी पथकामार्फत गस्त होती. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मोपेडस्वार महिला पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यांतर्गत आठ मोपेडवरून प्रत्येकी दोन महिला गस्तीवर असतील.

या सर्व मोपेड महिला पोलिसांच्या असतील. त्यांच्या मोपेडमधील इंधन मात्र सरकारी असेल. शिवाय त्याचे स्वतंत्र लॉगबुकही असेल. गस्तीवरील महिला पोलिसांची संख्या महिनाभरा दुप्पट होईल. शाळा, महाविद्यालय, मुलींचे वसतिगृह आणि निर्जनस्थळी गस्त करण्याचे आदेश मोपेडस्वार महिला पोलिसांना देण्यात आल्याचे उपायुक्तांनी सांगितले.

महाविद्यालयीन मुलींना स्वरक्षणाचे धडेशाळा-महाविद्यालयीन मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला पोलीस कर्मचारी हे प्रशिक्षण देणार आहेत. पंधरा दिवसांचे हे प्रशिक्षण असेल आणि ५० विद्यार्थिनींच्या ग्रुपला हे प्रशिक्षण दिले जाईल.हे प्रशिक्षण कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. सुरुवातीला पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हे प्रशिक्षण दिले जात असल्याचे उपायुक्त डॉ. धाटे-घाडगे यांनी सांगितले. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसsexual harassmentलैंगिक छळWomenमहिला