शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

पंचायत राज निवडणुकीसाठी २० रोजी शरद पवार औरंगाबादेत

By admin | Updated: October 12, 2016 01:14 IST

औरंगाबाद : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी २० आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे औरंगाबादमध्ये येत असून,

औरंगाबाद : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी २० आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे औरंगाबादमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा भव्य विभागीय मेळावा होणार आहे. राज्यात येऊ घातलेल्या पंचायत राज निवडणुकांच्या निमित्ताने खा. पवार यांनी विभागीय मेळावे सुरूकेले आहेत. मराठवाड्यात १५ आॅक्टोबरनंतर मेळावा होणार असल्याचे ‘लोकमत’ने आधीच प्रसिद्ध केले होते. मराठा समाजाच्या मुंबईत निघणाऱ्या संभाव्य मोर्चाची तारीख आता पुढे गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने २० आॅक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. बीड बायपासवरील एका मैदानावर हा मेळावा होणारआहे.मेळाव्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांचा दौरा अद्याप निश्चित नाही. मेळाव्याच्या तयारीची जबाबदारी जिल्हाध्यक्ष आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आणि पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्यात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहेत. मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाची ठिणगी औरंगाबादमधून पडली. त्यानंतर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, असे वक्तव्य खा. पवार यांनी औरंगाबादेतच सर्वप्रभम केले होते. त्यामुळे औरंगाबादेतील मेळाव्यात पक्ष आणि खा. पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. पक्षाच्या दृष्टीने पंचायत राज निवडणुकीची तयारी म्हणून हा मेळावा होणार आहेत. शिवाय पंचायत निवडणुका एकट्याने लढविण्याबाबतची चाचपणीही या विभागीय मेळाव्याद्वारे होणार आहे.