मंठा : ग्रामपंचायत बरखास्त करून शासनाने मंठा ग्रामपंचायतला नगर पंचायतीचा दर्जा दिला. नगर पंचायतीच्या प्रशासक म्हणून तहसीलदार छाया पवार यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.मंठा ग्रामपंचायतीला नगर पंचायतचा दर्जा देण्याची मागणी मंठा तालुका विकास कृती समितीकडून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. तर ग्रा.पं.सह विविध पक्ष संघटनांनीही मागणी केली होती. त्यांनतर मंठा ग्रामपंचायत बरखास्त करून नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे. सरपंच राजेश मोरे यांच्याकडून तहसीलदार छाया पवार यांनी सोमवारी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी उपसरपंच प्रसाद बोराडे, ग्रा.पं. सदस्य कय्युम कुरैशी, सखाराम बोराडे, कैलास बोराडे, राकाँ अध्यक्ष शरद बोराडे, कलंदरखाँ पठाण, इमामोद्दीन पटेल, प्रदीप वाघमारे, गणेश बोराडे, शेख एजाज, शबाब कुरैशी, यशवंत बोराडे, अन्साबाई राठोड आदी उपस्थित होते.
मंठा प्रशासकपदी छाया पवार
By admin | Updated: June 16, 2015 00:48 IST