शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलींसोबत अश्लील चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:23 IST

वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना बजाजनगरात उघडकीस आली. पित्याचा अन्याय गेली पाच वर्षे सहन करणा-या बापाची वाईट नजर लहान बहिणीवरही पडली. लहान बहिणीला वाचविण्यासाठी मोठ्या बहिणीने अश्लील चाळे करणा-या जन्मदात्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना बजाजनगरात उघडकीस आली. पित्याचा अन्याय गेली पाच वर्षे सहन करणा-या बापाची वाईट नजर लहान बहिणीवरही पडली. लहान बहिणीला वाचविण्यासाठी मोठ्या बहिणीने अश्लील चाळे करणा-या जन्मदात्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.बजाजनगर परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी पुणे येथे आजी-आजोबांकडे आहे. या मुलीचे वडील (४२) हे वाळूज एमआयडीसीतील कंपनीत फिटर आहेत. पीडित मुलगी सन २०१२ व जून २०१६ मध्ये बजाजनगरात आई-वडिलांकडे राहत असताना रात्री मुलगी झोपेत असताना वडील तिच्याशी अश्लील चाळे करायचे. घाबरलेल्या मुलीने आई, आजी-आजोबांना माहिती दिली. मात्र, मुलीच्या तक्रारीकडे आईने दुर्लक्ष केल्यामुळे आरोपी अनेकदा छेड काढत असे. यानंतर काही दिवसांनी पीडित मुलगी शिक्षणासाठी पुणे येथे गेली. तेथे मुलीचा मोठा भाऊ तसेच तिचे आजी-आजोबा राहत आहेत. महिनाभरापूर्वी तिचे आई-वडील व लहान बहीण पुण्याला भेटण्यासाठी गेले होते. पुण्यात तीन ते चार दिवस राहिल्यानंतर वडील औरंगाबादला परतले, तर तिची आई व लहान बहीण काही दिवस पुण्यातच थांबल्या होत्या.आपल्या सोबत तसेच लहान बहिणीसोबत अश्लील चाळे करणा-या वडिलांना धडा शिकविण्यासाठी मुलगी पुण्याहून वाळूज एमआयडीसीत आली. मंगळवारी (दि.२० फेब्रुवारी) तिने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून पित्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आरती जाधव या करीत आहेत.आईसोबत पुण्याला गेलेल्या पीडित मुलीच्या लहान बहिणीने वडील तुझ्याशी अश्लील चाळे करीत होते. आता माझ्यासोबतसुद्धा तसेच करतात, असे सांगितले.तू वडिलांविरुद्ध तक्रार न केल्यास माझ्यासोबत असा घाणेरडा प्रकार पुन्हा होईल, असे लहान बहिणीने सांगितले होते. लहान बहिणीची आपबिती ऐकून मोठ्या बहिणीने पित्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.