शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्पामधील सेक्स रॅकेट प्रकरण : त्या ‘थाई’ मुलींचे ३ महिन्यांपासून वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:23 IST

प्रोझोन मॉलमधील स्पामध्ये चालणा-या सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या ९ मुलींचे तीन महिन्यांपासून शहरात बेकायदा वास्तव्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रोझोन मॉलमधील स्पामध्ये चालणा-या सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या ९ मुलींचे तीन महिन्यांपासून शहरात बेकायदा वास्तव्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे विदेशी तरुणी तीन महिन्यांपासून शहरात राहतात आणि आपल्या गुप्तचर यंत्रणेला याची कोणतीही खबर लागू नये, हे तर त्याहून अधिक धक्कादायक आहे.प्रोझोन मॉलमधील अनंतरा आणि दी स्ट्रेस स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुरुवारी रात्री पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या पथकाने धाड मारून पर्दाफाश केला. त्यावेळी तेथे थायलंडमधून आणण्यात आलेल्या ९ मुली आढळल्या.टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या या मुलींचे साधारणत: तीन महिन्यांपासून औरंगाबादेत बेकायदा वास्तव्य होते, अशी धक्कादायक माहिती पोलिसांना समजली. टुरिस्ट व्हिसावर आलेल्या विदेशी नागरिकांना पोलिसांच्या विदेशी नागरिक (फॉरेनर) शाखेत जाऊन नोंदणी करणे आवश्यक असते; मात्र यापैकी एकाही मुलीने त्यांच्या शहरातील वास्तव्याची माहिती पोलिसांना दिली नाही. पोलिसांकडे नोंदणी केल्यानंतर ते किती दिवस शहरात राहणार आहेत. कोठे मुक्कामी आहेत आणि कोणत्या पर्यटन स्थळाला भेटी देणार आहेत, याबाबतची माहिती त्यांना पोलिसांना द्यावी लागते. छुप्या मार्गाने चालणाºया सेक्स रॅॅकेटमध्ये काम करण्यासाठी त्या आल्याने त्यांनी पोलिसांकडे नोंदणी केली नाही आणि त्यांना येथे आणणाºया शशांक खन्ना यानेही ही बाब पोलिसांपासून लपवून ठेवली.खन्नाने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये होते त्यांचे वास्तव्यस्पा चा मॅनेजर खन्ना यानेच या मुलींना थायलंडमधून आणल्याचे समोर आले. त्यानेच सिडको एन-१ मधील एका अपार्टमेंटमधील पाच रूमचा फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे त्यांना ठेवले होते.विशेष म्हणजे त्यांच्यासोबत तोही तेथे राहत असे. प्रोझोन मॉलसमोर आणि अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर हा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये विदेशी नागरिक वास्तव्य करीत असल्याची माहिती पोलिसांना समजली नाही.गुप्तचर यंत्रणा गाफीलजागतिक पर्यटन स्थळ म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. येथे नियमित विदेशी पर्यटकांची वर्दळ असते. शहराच्या आणि प्रोझोन मॉलसारख्या गर्दीच्या ठिकाणी ९ विदेशी मुली स्पा च्या नावाखाली घाणेरडा व्यवसाय करतात आणि मॉलपासून हाकेच्या अंतरावर सुमारे तीन महिन्यांपासून राहतात, याविषयी कोणतीही माहिती पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला लागत नाही, ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आहे.