शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
3
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
4
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
5
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
6
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
7
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
8
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
9
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
10
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
11
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
12
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
13
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
14
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
15
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
16
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
17
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
18
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
19
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
20
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन

गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: October 28, 2014 01:02 IST

सुनील कच्छवे ,औरंगाबाद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथे केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे

सुनील कच्छवे ,औरंगाबादमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथे केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे तक्रार निवारण प्राधिकाऱ्यांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ खातेनिहाय चौकशी करावी आणि ग्रामरोजगार सेवकाला कामावरून कमी करावे, असे आदेश तक्रार निवारण प्राधिकाऱ्यांनी दिले आहेत. लोकमतने आॅक्टोबर २०१३ मध्ये या गैरव्यवहारावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर बरोबरच वर्षभरानंतर आता त्यावर शिक्कामोर्तब झाले.टाकळी राजेराय ग्रामपंचायतीअंतर्गत २०१० ते २०१३ या काळात रोहयोअंतर्गत सिमेंट नाला बांध, दगडी नाला बांध, माती नाला बांध इ. कामे करण्यात आली. मात्र अनेक मजुरांना मजुरी मिळाली नाही. ती रक्कम परस्पर पोस्टातील खात्यातून काढून घेण्यात आली. त्याची कुणकुण लागल्यानंतर मजुरांनी पोस्ट आॅफिसवर मोर्चा काढून पासबुकची मागणी केली. त्यानंतर मजुरांना पासबुक मिळाले. तेव्हा त्यावर मजुरीची रक्कम उचलल्याचे आढळून आले. त्यामुळे ४७ मजुरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. गावातील सरपंच, ग्रामरोजगार सेवक, पोस्ट आॅफिसमधील कर्मचारी यांनी संगनमत करून ही रक्कम लाटल्याचा आरोप मजुरांनी केला होता. तसेच तक्रार निवारण प्राधिकाऱ्यांना आवश्यक पुरावेही सादर केले होते. तक्रार निवारण प्राधिकाऱ्यांनी नुकतीच या प्रकरणात चौकशी पूर्ण करून आपला अहवाल दिला. चौकशीदरम्यान १३ मजुरांचे जबाब घेण्यात आले. तसेच वनरक्षक तरटे, जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे शाखा अभियंता अमृतकर, ग्रामरोजगार सेवक शेख मिनाज शेख हनिफ, कृषी सहायक जाधव, राजू राठोड, सरपंच तिलकचंद मेठी, ग्रामसेवक बी. बी. गव्हाणे, पोस्टमास्तर बाबू ठेंगळे या प्रतिवादींचे जबाबही घेतले. तक्रार निवारण प्राधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात येथील कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला आहे. संबंधित प्रकरणात गैरव्यवहार झाला असल्यामुळे ग्रामरोजगार सेवकाला तात्काळ कामावरून कमी करावे आणि यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करावी, असे आदेशात म्हटले आहे. शाळकरी मुले, शिक्षकांनाही दाखविले मजूरटाकळी राजेराय येथे बारा वर्षांचा शाळकरी मुलगा, १४ वर्षांची शाळकरी मुलगी आणि वस्तीशाळेतील एका शिक्षकालाही मजूर दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मुलांनी कोणतेही काम केलेले नाही. तरीही त्यांच्या नावे जॉबकार्ड तयार करून त्याआधारे पोस्टातून त्यांची मजुरी उचलण्यात आली आहे. सलग सहा महिने त्यांच्या नावे दरमहा ४ ते ८ हजार रुपयांप्रमाणे रक्कम जमा झाली आणि ती खात्यातून काढूनही घेतली. त्यांच्या हजेरीपत्रकाच्या प्रतीही तक्रार निवारण प्राधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्या होत्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रौढ व्यक्तीलाच काम देण्याची तरतूद आहे. कायद्याच्या भाषेत प्रौढ व्यक्ती म्हणजे १८ वर्षांवरील व्यक्ती असे समजले जाते. मात्र, इथे मजूर दाखविलेली शाळकरी मुले १२ आणि १४ वर्षांचीच आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध बालमजुरी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी टाकळी राजेराय येथील तरुण मनोज कुचे यांनी केली आहे. टाकळी राजेराय येथील मनोज कुचे यांनी वर्षभरापासून या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी, तक्रार निवारण प्राधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे सादर केली.एवढेच नाही तर मजूर दाखविलेल्या शाळकरी मुलांचे पोस्टाचे पासबुक, त्यांचे शाळेतील हजेरीपत्रक हेही सादर केले. तसेच चौकशीदरम्यान सातत्याने मजुरांची बाजू मांडली.