शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

सात जण निलंबित!

By admin | Updated: December 2, 2014 00:52 IST

औरंगाबाद : शालेय पोषण आहाराची तपासणी करतानाच राज्य समीक्षा पथकातील शिक्षण संचालकांनी घेतलेल्या गुणवत्ता चाचणीत विद्यार्थी नापास झाले.

औरंगाबाद : शालेय पोषण आहाराची तपासणी करतानाच राज्य समीक्षा पथकातील शिक्षण संचालकांनी घेतलेल्या गुणवत्ता चाचणीत विद्यार्थी नापास झाले. एवढेच नव्हे तर सातकुंडच्या शाळेतील गुरुजींना एक वाक्यही धड लिहिता आले नाही. शिक्षणातील ही गुणवत्ता पाहून पथक पुण्याला परतले आणि इकडे संतापलेल्या प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी एक केंद्रप्रमुख, तीन मुख्याध्यापक आणि तीन शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले. सातकुंडच्या शाळेचे मुख्याध्यापक व तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. लोहगाव (ता. पैठण)चे केंद्रप्रमुख अशोक बनकर, ढाकेफळ (ता. पैठण) जि.प. शाळेचे मुख्याध्यापक एस.बी. चव्हाण, कानडगाव (ता. खुलताबाद) जि.प. शाळेचे मुख्याध्यापक बी.टी. चव्हाण, सातकुंड (ता. कन्नड) जि.प. शाळेचे मुख्याध्यापक गणपत श्रावण मोरे आणि सहशिक्षक दामू रामचंद्र साळुंके, रामराव अर्जुन सोनवणे आणि संजय रामदास पाटील यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले की, शालेय पोषण आहार योजना राबविण्यात केलेली कसूर, गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न व नियोजन नाही, शिक्षकांची शैक्षणिक कामाची तयारी नसणे व स्वच्छतेचा अभाव आदी कारणांमुळे सात जणांना निलंबित करण्यात आले आहे.पटावरील किमान ८० टक्के विद्यार्थ्यांना एकूण शालेय दिवसाच्या ८० टक्के दिवस खिचडी मिळणे आवश्यक आहे; परंतु औरंगाबाद जिल्ह्यात हे प्रमाण कमी झाल्याने हे पथक तपासणीसाठी आलेहोते. प्राथमिक विभागाचे सहसंचालक गोविंद नांदेडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत अपर्णा शेंडकर, युनिसेफच्या अपर्णा देशपांडे, बारामती येथील अधीक्षक शिल्पा मेनन, एसएनडीटी विद्यापीठाच्या आहारतज्ज्ञ श्रीमती नन्नावरे आणि स्थानिक अधिकाऱ्यांपैकी शिक्षण उपसंचालक सुधाकर बानाटे, अन्न व औषधी विभागाचे कासारे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय वाघ यांचा समावेशहोता. दि.२६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत पथकाने जिल्ह्यातील २४ शाळांची तपासणी केली. राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने हेदेखील शेवटच्या दिवशी या पथकात सामील झाले होते. ४शालेय पोषण आहार योजनेतील खिचडी खाण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियानातून ताटे खरेदी करण्यात आली आहेत. ही ताटे शाळेतच ठेवणे बंधनकारक आहे; परंतु ढाकेफळ शाळेतील शिक्षकांनी ही ताटे आपापल्या घरी नेल्याचे समितीला दिसून आले. विद्यार्थी घरून आणलेल्या डब्यातच खिचडी खाताना आढळले. ४सातकुंडच्या शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गाचे प्रश्न शिक्षण संचालकांनी विचारले; परंतु विद्यार्थ्यांना उत्तरे देता आली नाहीत. वर्गशिक्षकांचे नावही त्यांना लिहिता आले नाही. उपस्थित एका शिक्षकाला या पथकाने ‘मुंबईच्या हल्ल्यात जवान धारातीर्थी पडला’ हे वाक्य लिहिण्यास सांगितले; परंतु शिक्षक ते शुद्ध स्वरूपात लिहू शकले नाहीत. यामुळे शाळेतील शिक्षकांचीच गुणवत्ता पडताळणी झाली, त्यात शिक्षकांची शैक्षणिक तयारी काहीच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे उपस्थित तीनही शिक्षक व मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले. शाळेचे अन्य दोन शिक्षक रजेवर होते. दर्जेदार शाळाही४पिंप्री (ता. सिल्लोड), ममनापूर, देवळाणा, निर्गुडी (ता. खुलताबाद), गुरुधानोरा येथील शाळा दर्जेदार आहेत, असे पथकाला आढळल्या. पिंप्रीच्या शाळेस ग्रामस्थांनी अडीच एकर जागा दान दिली असून, लोकवर्गणीतून त्या जागेला कुंपणही घालून दिले आहे. शाळा व्यवस्थापनाने त्या जागेवर उद्यान फुलविले आहे. उर्वरित शाळांतून गुणवत्ता अभियान योग्य प्रकारे राबविले जात असल्याचे दिसले.