औरंगाबाद व बालानगर येथील चांडक कुटुंबीय भाड्याच्या कार (क्र. एमएच १४, एफसी २४८८)ने विवाह समारंभासाठी जळगावला गेले होते. तेथून परतताना आळंदजवळ त्यांची कार दुचाकी (एमएच २०, डीयू. १८४६) ला जोराने धडकली. यात दुचाकीवरील दोघेजण १५ फूट उडून बाजूला पडले. यानंतर कारही रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. या अपघातात दुचाकीवरील सुरेश गंगाराम राऊत व गंगाधर धोंडीराम सुरे (दोघेही रा. सिसारखेडा) यांच्यासह कारमधील शिवप्रसाद चांडक, संतोष चांडक, शिवबा चांडक, विजया चांडक, श्रीनाथ चांडक हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच वडोद बाजार ठाण्याचे दत्ता मोरे, सिद्धार्थ वक्ते, रेखा कांबळे, निवृत्ती मदने यांनी धाव घेऊन जखमींना औरंगाबादेतील रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.
130721\20210713_190053.jpg
आळंद जवळ झालेल्या अपघातातील कार व दुचाकीची झालेली अवस्था.