शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

सात आरोग्य केंद्र डॉक्टरांविना !

By admin | Updated: July 11, 2016 00:23 IST

उस्मानाबाद : सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथीचे आजार बळावू लागले आहेत. असे असतानाच सर्वसामान्यांसाठी किफायतशीर ठरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या एक -दोन नव्हे,

उस्मानाबाद : सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथीचे आजार बळावू लागले आहेत. असे असतानाच सर्वसामान्यांसाठी किफायतशीर ठरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या एक -दोन नव्हे, तब्बल सात प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांविनाच सुरू आहेत. येथील प्रत्येकी दोन्ही डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. उर्वरित केंद्रांतही काही समाधानकारक चित्र नाही. जेथे दोन डॉक्टरची गरज आहे, तेथे एकेकच डॉक्टर कार्यरत आहेत. मिटींग काही कार्यालयीन काम निघाल्यास सदरील आरोग्य केंद्रही रामभरोसे असतात. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. असे असतानाही या ठिकाणी डॉक्टरांच्या रिक्त जागांमुळे आरोग्य सेवेचे तीन-तेरा झाले आहेत.राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आल्यानंतर आरोग्य सेवा सुधारेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. परंतु, आजही डॉक्टरांच्या रिक्त जागांचा प्रश्न काही केल्या सुटलेला नाही. उलट पूर्वीच्या तुलनेत अधिक गंभीर बनला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ४२ प्राथमिक आरोग्य केंद्र चालविली जातात. बहुतांश केंद्रांना सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा रिक्त जागांचा प्रश्न भेडसावित आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राला दोन डॉक्टर असणे अपेक्षित आहे. परंतु, सात आरोग्य केंद्र अशी आहेत, की जेथे एकही डॉक्टर कार्यरत नाही. त्यामुळे या केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना कर्मचाऱ्यांच्या हातूनच औषध, गोळ्या घेऊन घरचा रस्ता धरावा लागत आहे. आजाराचे निदान झालेले नसते. त्यामुळे सदरील गोळ्यांच्या माध्यमातून आजार बरा होईलच, याची शास्वती नसते. परिणामी रूग्णांना ऐपत नसतानाही खाजगी दवाखान्याचा उंबरठा ओलांडावा लागत आहे. आजघडीला येरमाळा, केशेगाव, आनाळा, जवळा (नि), काटगाव, सावरगाव, पारा ही आरोग्य केंद्र रामभरोसे सुरू आहेत. याचा फटका रूग्णांना सोसावा लागत आहे. ठोकताळ्यानुसार येथील औषध निर्माण अधिकारी अथवा अन्य कर्मचारी गोळ्या, औषधे देत आहेत. परंतु, आजाराचे योग्य निदान होत नसल्याने आजार बरा होत नाही, असे रूग्णांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे पालकमंत्र्यांनी लक्ष देऊन विशेष बाब म्हणून रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहेत. (प्रतिनिधी) दुष्काळी जिल्हा म्हणून शासनाने जिल्हास्तरावरच भरती प्रक्रिया राबविण्याबाबत स्वतंत्र आदेश काढले होते. त्यानुसार जिल्हभरातील तब्बल शंभरावर डॉक्टरांनी प्रशासनाकडे अर्जही केले होते. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त अर्जांची छाननी करून शासनाकडे पाठविल्याचे समजते. परंतु, अद्याप एकही पद भरण्यात आलेले नाही. त्यामुळे रिक्त जागांवर डॉक्टरांची नियुक्ती होणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.वाशी तालुक्याची अवस्था तर अत्यंत विदारक बनली आहे. पारा आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर नाही. पारगाव आरोग्य केंद्रातील एक जागा रिक्त आहे. त्यामुळे पारा आरोग्य केंद्राचा पदभार द्यायचा म्हटले तरी डॉक्टर उपलब्ध नाहीत. तालुक्याचा विचार करता केवळ एकच डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. प्राथमिक अरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. परंतु, आज आठ पैकी केवळ उस्मानाबाद, वाशीसह तीनच तालुक्यांची पदे भरलेली आहेत. उर्वरित पाच तालुक्यांना कोणीही वाली नाही. याचा परिणाम आरोग्य केंद्रांच्या कारभारावर झाल्याचे बालले जाते.गरजेच्या तुलनेत फारच कमी डॉक्टर ४याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांच्याशी संपर्क साधला असता, गरजेच्या प्रमाणात फारच कमी डॉक्टर उपलब्ध होत आहेत. जवळपास सात आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपलब्ध नाही. पर्यायी सोय करण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी सदरील उपाययोजना तोकड्या पडत आहेत. जिल्हास्तरीय भरती प्रक्रिया पूर्ण होवून लवकरच डॉक्टर उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.