शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सेविका-प्रकल्प अधिकाऱ्यांत ‘ड्रेसकोड’ वरुन वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 19:36 IST

वाळूज महानगर : वाळूजच्या गरवारे कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात मंगळवारी आयोजित प्रशिक्षण शिबिरात ड्रेसकोडवरून बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी कार्यकर्त्यांत वाद झाला. या अपमानास्पद वागणुकीमुळे दोन अंगणवाडी कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाळूज महानगर : वाळूजच्या गरवारे कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात मंगळवारी आयोजित प्रशिक्षण शिबिरात ड्रेसकोडवरून बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी कार्यकर्त्यांत वाद झाला. या अपमानास्पद वागणुकीमुळे दोन अंगणवाडी कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एकात्मिक बालविकास प्रकल्प-२ गंगापूरच्या वतीने अंगणवाडी कार्यकर्त्या व सेविकांसाठी वाळूजला दोनदिवसीय आकार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गरवारे कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात सकाळी १० वाजेपासून वाळूज, शेंदुरवादा व अंबेलोहळ या परिसरातील जवळपास १३० अंगणवाडी कार्यकर्त्या जमल्या होत्या. यात बालविकास प्रकल्प अधिकारी कोमल कोरे, पर्यवेक्षिका मीना पाटील, सुरेखा पाटील, प्रतिभा परदेशी, संजीवनी चंगुडे, चित्रा खोचे, मनीषा मोरे या मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या.

दरम्यान, प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी कमळापूरच्या अंगणवाडी कार्यकर्त्या सुनीता पन्हाड या ड्रेसकोडमध्ये न आल्यामुळे कोरे यांनी त्यांना सुनावले. यावरून दोघींत वाद झाला. सुनीता पन्हाड या प्रकारामुळे रक्तदाब वाढल्याने बेशुद्ध पडल्या. हा प्रकार लक्षात येताच अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर गोंधळ घातला. याचवेळी भारती जाधव याही बेशुद्ध पडल्याने अंगणवाडी कार्यकर्त्या अधिकच संतप्त झाल्या.

या प्रकारानंतर सुनीता पन्हाड व भारती जाधव या दोघींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघींची प्रकृती स्थिर असून पन्हाड यांना डायबेटीज व भारती जाधव यांना थॉयराईडचा आजार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कमल कोरे या कायम अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप अंगणवाडी कार्यकर्त्या व सेविकांनी केला आहे.

या प्रकरणी सुनीता पन्हाड यांनी कमल कोरे यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. यासंदर्भात कमल कोरे म्हणाल्या की, अंगणवाडी कार्यकर्त्यांना फक्त ड्रेसकोड परिधान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशिक्षण केंद्रातून कुणालाही बाहेर काढले नाही...........................बजाजनगरात दोन्ही अंगणवाडी कार्यकर्त्यांची भेट घेऊन या प्रकाराची माहिती जाणून घेतली. या प्रकरणी प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांचे जबाब घेऊन दोषी आढळल्यास प्रकल्प अधिकारी कोरे यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.- प्रसाद मिरकले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद