शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मुक्तार्इंच्या पालखीची २५० वर्षांपासून बीडकरांकडून सेवा

By admin | Updated: June 19, 2017 23:45 IST

बीड : आषाढी वारीसाठी मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबार्इंची पालखी मंगळवारी बीड शहरात येत आहे.

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आषाढी वारीसाठी मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबार्इंची पालखी मंगळवारी बीड शहरात येत आहे. ३०८ वर्षांची परंपरा असलेली ही पालखी बीडकरांच्या श्रद्धेची, भावनेची आणि अस्मितेची बनली आहे. पालखीचे आगमन आणि प्रस्थानावेळी बीडमध्ये वरुणराजा स्वागत करतो अशी अनुभूती भाविकांना आलेली आहे. मुक्ताईच्या पदस्पर्शाने बीडनगरी धन्य होते.आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब, अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्र महाराज हरणे यांच्या नेतृत्वात हा पालखी सोहळा सुरू होतो. मजल-दरमजल करीत टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीचा ३३ दिवस प्रवास सुरू असतो. सुधाकर पाटील हे पालखी मार्गावरील व्यवस्थेची जबाबदारी सांभाळतात. बीड येथील माळीवेस हनुमान मंदिरात कितीतरी वर्षांपासून पालखी मुक्कामाची परंपरा आहे. संत मुक्ताई पालखीचे आगमन बीडच्या भाविकांसाठी जणू दसरा, दिवाळी असते. अनेक महिला भगिनी नवस फेडण्यासाठी आदिशक्ती मुक्ताईची खणा, नारळाने ओटी भरतात. नवसपूर्तीचा आनंदही अनेक भाविकांमध्ये पहायला मिळतो. हनुमान मंदिर विश्वस्तांच्या वतीने पालखीच्या एक दिवस मुक्कामाची निवास आणि भोजन व्यवस्था केली जाते. त्यानंतर पालखी शहरातील बालाजी मंदिराकडे प्रस्थान होते. तेथे पालखीचा मुक्काम असतो. नंतर पालखी पालीच्या दिशेने प्रस्थान करते. हनुमान मंदिर विश्वस्त मंडळाचे शांतीलाल पटेल, चंद्रकांत पाटील, विश्वासराव मनसबदार, अ‍ॅड. प्रसाद मनसबदार, संपतराव मारकड, सुरेश नहार, राजाभाऊ बाहेगव्हाणकर, लक्ष्मणराव जाधव, रमेश पाटील यांच्यासह भक्तमंडळी वारकरी भाविकांचे आदिरातिथ्य करतात. हनुमान मंदिर ट्रस्ट, रोटरी क्लब आॅफ बीड सिटीच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. डॉक्टरांची ‘निमा’ संघटना तसेच महाबली सेवा परिवाराचा यात सहभाग असतो. याशिवाय शहरातील विविध सामाजिक संघटना आणि भाविकांच्या वतीने वारकऱ्यांची काळजी घेतली जाते.