शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या वॉर्डात रस्त्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: September 15, 2015 00:32 IST

उन्मेष पाटील , कळंब विद्यमान नगराध्यक्षा मिराताई चोंदे व उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी यांच्या प्रभाग क्र. १ मध्ये सध्या रस्ते, नाल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

उन्मेष पाटील , कळंबविद्यमान नगराध्यक्षा मिराताई चोंदे व उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी यांच्या प्रभाग क्र. १ मध्ये सध्या रस्ते, नाल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय घर तेथे शौचालय द्यावे, ही या भागातील नागरिकांची मागणी अजूनही न.प. प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली नाही.शहरातील प्रभाग क्र. १ मध्ये शासकीय झोपडपट्टी (इंदिरानगर) शेरी गल्ली, शिवाजी नगर, चोंदे गल्ली आदी भाग येतो. या प्रभागामध्ये सत्ताधारी काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. या प्रभागातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटने बनविले आहेत. परंतु दोन-तीन वर्षातच या रस्त्यांनी माना टाकल्याचे चित्र दिसत आहे. या सिमेंट रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत. या प्रभागातील नाल्यांचीही दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी नाल्यांची पडझड झाल्याने नालीतील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आले आहे. पावसाळ्यात हेच पाणी घरातही शिरत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.शासकीय झोपडपट्टी भागात ‘घर तेथे शौचालय’ ही योजना राबविण्याची आवश्यकता आहे. या भागात अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांची संख्या मोठी आहे. मोलमजुरी करुन उपजिवीका करणाऱ्या वर्गाला जेथे घराच्या चार भिंती उभा करताना कसरत करावी लागते तेथे शौचालयाचा खर्च परवडणारा नाही. यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेवून कमी जागेत उभा राहणारे शौचालय बांधून द्यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे. या भागात न.प.ने सार्वजनिक शौचालय बांधले आहे. मात्र, त्याला शौचालयाला दरवाजे नाहीत, रस्ता नाही, वीज अन् पाणीही नाही. त्यामुळे या शौचालयाचा वापर करता येत नाही. शौचालयांची संख्याही तोकडी असल्याने त्याचा कोणालाच उपयोग होणार नाही, असे नागरिकांनी सांगितले.प्रभाग क्र. १ मधील बहुतांश नागरिक अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत. त्यामुळे त्यांना माफक दरात वैद्यकीय सुविधा तसेच औषधोपचार पुरविण्याची आवश्यकता आहे. खर्चिक औषधांमुळे अनेकदा उपचाराअभावी गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे या भागातील नागरिकांचे अनुभव आहेत. येथे नगर परिषदेने प्राथमिक सुविधासह वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली तर मोठा आधार मिळू शकणार आहे.